काही वर्षापूर्वी आयपीएल सामन्यात खेळणारा ऋतुराज गायकवाड याने मराठी चित्रपट अभिनेत्री सायली संजीव हिच्या एका फोटोवर एक कमेंट करत हार्टचे इमोजी शेअर केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत सायलीने देखील हार्टचे इमोजी दिले होते या एका गोष्टीवरून सायलीच्या चाहत्यांमध्ये या दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली. ऋतुराज गायकवाड सायलीच्या प्रेमात आहे अशा बातम्या सगळीकडे व्हायरल झाल्या तेव्हा मात्र चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स आणि या बातम्या पाहून ऋतुराजने आपली कमेंट डिलीट केली. त्यानंतरही अनेकदा सायलीला ऋतुराजच्या नावावरून चिडवण्याचा प्रयत्न झाला . हा मुद्दा सुबोध भावे ने देखील काढला होता आणि तुमचं अफेअर आहे का? असेही सायलीला विचारले होते. झी मराठीच्या बस बाई बस या शोमध्ये सुबोध भावे सूत्रसंचालन करत असे त्यात सायलीला आमंत्रित करण्यात आले होते.

तेव्हा सुबोधने याच मुद्द्याला हात घालून सायलीला बोलते केले होते. त्यावेळी सायलीने उत्तर दिले होते की , ‘ ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे हे दोघेही माझे खूप चांगले मित्र आहेत. हे दोघेही माझी काहे दिया परदेस ही मालिका बघत होते. तेव्हापासून हे दोघेही माझे चाहते झाले होते. परंतु क्रिकेटर मालिका कुठे बघत असतील कारण त्यांना तेवढा वेळही मिळत नसतो असे मला वाटायचं पण ऋतुराज बद्दल सांगायचं तर तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे आणि आमच्यात केवळ मैत्री आहे. ‘ असे म्हणत तिने हा विषय इथेच संपवला होता. मात्र ऋतुराजने एका सामन्यात सात सिक्स मारून रेकॉर्ड बनवला तेव्हा सायलीचे नाव पुन्हा त्याच्यासोबत जोडण्यात येऊ लागले. यावर आता सायलीने मौन सोडण्याचे ठरवले आहे. सायलीचा गोष्ट एका पैठणीची हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला सायलीने ठिकठिकाणी हजेरी लावली होती आणि चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना विनंती केली होती. त्यावेळी सायलीला पुन्हा ऋतुराजच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा सायलीने या चर्चेला आता पूर्णविराम देणारे उत्तर दिलेले पाहायला मिळाले. सायली म्हणते की, ‘ ऋतुराज आणि आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो.

आम्ही एकमेकांसोबत बोलतही होतो मात्र जेव्हापासून आमच्या नात्याला एक वेगळा अर्थ लावण्यात आला तेव्हापासून आमच्या मैत्रीच्या नात्यात दुरावा येत गेला. आमच्या निखळ मैत्रीवर त्याचा खूप वाईट परिणाम झाला. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय हे पाहून आम्ही आता मित्रासारखं धड बोलु ही शकत नाही आहोत. मी २९ वर्षांची आहे आणि तो २५ वर्षांचा आहे याबद्दल देखील मी वेळोवेळी खुलासा केला होता. याबाबत अनेक चर्चाही पाहायला मिळाल्या परंतु आता आमच्यातील हे मैत्रीचं नातं इतकं दूर गेलं आहे की आमच्यात आता काहीच बोलणं देखील होत नाही. या सगळ्या चर्चेमुळे आमच्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम झाला आहे’. क्रिकेटर ऋतुराज गायकवाड ह्याने आता आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित केलं असून आता तो विजय हजारे ट्रॉफी मध्ये धडाकेबाज कामगिरी करताना पाहायला मिळतोय. एका ओव्हरमध्ये ७ सिक्स मारल्याचा विक्रम त्याने मागील आठवड्यात केला आहे. ह्यात ६ बॉल मध्ये ६ सिक्स मारले आणि १ नो बॉल पडला त्यावरही त्याने ६ मारला आणि हा रेकॉर्ड बनला.