बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री पल्लवी सुभाष ही एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी सुभाषचे पूर्ण नाव आहे पल्लवी सुभाष शिर्के मात्र बहुतेक कलाकार आपले आडनाव न लावता ओळख बनवताना दिसले आहेत अशीच एक ओळख पल्लवीने देखील निर्माण केलेली पाहायला मिळत आहे. पल्लवी सुभाषला वकिलीचे शिक्षण घ्यायचे होते मात्र आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच तिने मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावले. इथेच तिला नाटकातून अभिनयाची संधी मिळाली. व्यावसायिक जाहिराती करत असतानाच पल्लवीने चार दिवस सासूचे या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली.

साहेब बीबी आणि मी या मालिकेनंतर तुम्हारी दिशा, करम अपना अपना, अधुरी एक कहाणी, कसम से, महाभारत अशा हिंदी मराठी मालिकेतून तिला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मराठी, हिंदी, कन्नड आणि तमिळ अशा विविध भाषिक चित्रपटातून पल्लविने विविधांगी भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख मिळवली. २०१९ सालच्या मिरांडा हाऊस या रहस्यमयी मराठी चित्रपटात तीने मुख्य भूमिका साकारली होती. पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी आणि साईंकित कामत या त्रिकुटाभोवती चित्रपटाचे कथानक गुरफटलेले पाहायला मिळाले . यानंतर पल्लवी फारशी कोणत्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाली नाही. परंतु आता जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पल्लवी तमिळ चित्रपटातून मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘सेकंड शो’ हा तिचा मुख्य भूमिका असलेला आगामी तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटात पल्लवी सुभाष सोबत अजमल अमीर, विद्या प्रदीप, हेमल रनसिंघे हे कलाकार झळकणार आहेत.

बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता सेकंड शो या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सेकंड शो हा ऍक्शन थ्रिलर, सस्पेन्स आणि हॉरर मुव्ही आहे. हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार असे बोलले जात होते मात्र काही कारणास्तव प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येऊ लागली. आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता पल्लवीसोबत तिच्या चाहत्यांना देखील लागून राहिली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर पल्लवी एका दमदार चित्रपटातून पुनरागमन करत असल्याने तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटात तिची भूमिका काय असणार हे पाहण्यासाठी तीच फॅन्स आतुर आलेले देखील पाहायला मिळत आहेत.