पाडवा संपन्न असे कॅप्शन देऊन अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांचे औक्षण करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या कॅप्शन सोबत क्रांती रेडकरने समीर वानखेडे यांना अनुसरून एक भावनिक पोस्ट लिहीली आहे त्यात ती म्हणते की, ‘माझा प्रिय… माझ्या उर्जेचा आणि सकारात्मकतेचा स्त्रोत, तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुझ्याकडे असणारी शांतता मला खूप काही शिकवून जाते…तुझा दृढनिश्चय तसंच तुझा प्रामाणिकपणा मला नेहमीच आश्चर्यात टाकतो. देशाप्रती तुझा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती आहे.

तुझ्या आपल्या लोकांसाठी किती सुंदर योजना आहेत हे फक्त मला माहीती आहे. हे घडवून आणण्यासाठी सर्वशक्तिचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असोत त्यासाठी आवश्यक असलेली ती सर्व शक्ती तुला प्रदान करो. तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून तुमचा प्रत्येक दिवस उजळत जावो आणि आम्हाला तुमचा दररोज अभिमान वाटत राहो”.. अशी भावनिक पोस्ट क्रांतीने शेअर केली आहे. आर्यन खान प्रकरणासहित सहा प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. अश्या बातम्या काही दिवसांपासून सोशिअल मीडियावर फिरताना पाहायला मिळाल्या. दरम्यान क्रांती रेडकरने एनसीबी कार्यालयातुन आलेले एक पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. त्यात स्पष्ट म्हटले आहे की, संजय सिंह हे या तपासकामाचे प्रमुख असतील. या प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणांचा तपास आता संजय सिंह यांच्याकडे देण्यात आला आहे. हा प्रशासकीय निर्णय असल्याचं NCB चे पश्चिम विभागीय उप महासंचालक मुथा अशोक जैन यांनी स्पष्ट केलंय.

शिवाय या कार्यवाहीत असेही म्हटले आहे की ज्या ज्या अधिकाऱ्यांवर अगोदर जी जबाबदारी सोपविण्यात आली होती त्या कोणत्याच अधिकाऱ्याला बडतर्फ केले जाणार नाही किंवा पदावरून काढले जाणार नाही. त्यांनी अगोदर जे काम सांभाळले होते त्याचेच कामकाज ते अधिकारी इथून पुढेही सांभाळतील असे त्या पत्रकात स्पष्ट म्हटले आहे म्हणजे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे देखील आपल्या पदावर असेच कार्यरत राहतील हे आता स्पष्ट झालं आहे. हे आदेश एनसीबी हेडक्वार्टर्स संजय कुमार सिंग यांनी जारी केले आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिच्या परिवाराला आर्यनच्या क्समुळे खूपच त्रास झालेला पाहायला मिळाला. पण हे सर्व बाजूला ठेऊन दिवाळी सण संपूर्ण परिवाराने साजराकेलेला पाहायला मिळाला. इतकंच नाही तर क्रांती रेडकर हीच पती समीर आणि त्याची बहीण ह्यांनीही घरी येऊन सण साजरा केला असल्याचे फोटो अभिनेत्री क्रांती रेडकर हिने तिच्या सोशिअल मीडियावर टाकलेले पाहायला मिळाले आहेत.