Breaking News
Home / जरा हटके / ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पंढरपूरच्या वारीत करतीये वारकऱ्यांची सेवा इतकंच नाही तर

ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पंढरपूरच्या वारीत करतीये वारकऱ्यांची सेवा इतकंच नाही तर

टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, तुकाराम’ चा गजर करत भक्तिमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी मार्गात वारकऱ्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी दात्यांचा जणू मेळावाच भरतो. पिण्याचे पाणी, नाश्ता, जेवण, रेनकोट, ब्लॅंकेट, छत्री, वैद्यकीय सुविधा असे विविध उपक्रम संघटना, संस्थेमार्फत राबवण्यात येतात. अशातच मराठी सृष्टीतील अभिनेत्री देखील या सोहळ्यात सहभागी होऊन त्यांच्या मदतीसाठी धावून आलेली पाहायला मिळते.

Kashmira Kulkarni actress in dindi
Kashmira Kulkarni actress in dindi

या अभिनेत्रीचे नाव आहे कश्मिरा कुलकर्णी. गश्मीर महाजनी याने कॅरी ऑन मराठा या चित्रपटातून मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. कश्मिरा कुलकर्णी ही या चित्रपटाची नायिका होती. या चित्रपटामुळे कश्मिराला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात तिन दाक्षिणात्य नायिका साकारली होती. या चित्रपटा अगोदर कश्मिरा मध्यमवर्ग मिडल क्लास या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर श्री गुरुदेवदत्त या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यात तिने अनुसूया मातेची महत्वाची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती. कधेंतो हा तिने अभिनित केलेला पहिला तेलगू चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. कश्मिरा ही केवळ अभिनेत्रीच नाही तर तिने ज्योतिष विद्या देखील अवगत केलेली आहे. याशिवाय ती इंटेरिअर डिझायनर तसेच मार्गदर्शक म्हणूनही काम करते. २०१९ साली ‘शुचिकृत्य’ या फाउंडेशनची तिने स्थापना केली आहे. या फाउंडेशन अंतर्गत पालखी मार्गात वारकऱ्यांना औषधं, अन्नदान, मेडिकल कॅम्प, पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जातात.

Kashmira Kulkarni actress in pandharpur wari
Kashmira Kulkarni actress in pandharpur wari

गेल्या काही वर्षांपासून ती असे विविध उपक्रम राबवताना दिसते. पूरग्रस्त, आदिवासी भागातील शाळेतील मुलांना कपडे, अन्नधान्य वाटप असे विविध उपक्रम या संस्थेतून राबविले जातात. तिच्या या कामाचे नक्कीच कौतुक व्हायला हवे हे वेगळे सांगायला नको. मराठी सृष्टीत खूप कमी कलाकार आहेत जे चंदेरी दुनियेत स्वतःची ओळख बनवत असताना सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात. सयाजी शिंदे, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी देखील अशीच एक ओळख निर्माण केलेली पाहायला मिळते. कश्मीराला या फाऊंडेशनच्या मध्यमातून रस्त्यावरील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी आणखी काही उपक्रम राबवण्याची ईच्छा आहे त्यासाठी ती नेहमीच धडपडताना पाहायला मिळाली आहे. या कार्यातून एक सामाजिक बांधिलकी जपणारी नायिका अशी एक वेगळी ओळख काश्मिराने जपली आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *