गेल्या काही दिवसांपासून मराठी सृष्टीत लग्नसोहळ्याचे बार उडताना दिसत आहेत. माहेरची साडी चित्रपट फेम अल्का कुबल आठल्ये यांची लेक देखील नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. अल्का आठल्ये आणि समीर आठल्ये यांना ईशानी आणि कस्तुरी या दोन कन्या आहेत. त्यांची थोरली मुलगी ईशानी आठल्ये आणि निशांत वालिया यांच्या लग्नाचा सोहळा नुकताच पार पडला असून या लग्नाला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री अर्चना नेवरेकर, किशोरी शहाणे, प्राजक्ता कुलकर्णी दिघे, स्मिता जयकर, मिलिंद गवळी या कलाकारांनी इशानीच्या लग्नसोहळ्यात तिला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती लावली होती.

अल्का कुबल आठल्ये यांची थोरली मुलगी ईशानी आठल्ये ही व्यावसायिक पायलट आहे. लहानपणापासून पायलट व्हायचं स्वप्न बाळगलेल्या ईशानीने २०१७ साली पायलट चालवण्याचे लायसन्स मिळवले होते. तर त्यांची धाकटी मुलगी कस्तुरी आठल्ये ही सध्या फिलिपाइन्सला एमबीबीएस करतीये , भविष्यात तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे. ईशानी आणि निशांत वालिया यांची जानेवारी २०२० साली रोका सेरेमनी साजरी करण्यात आली होती. या सोहळ्यानंतर तब्बल दोन वर्षांनी ईशानी आणि निशांत विवाहबद्ध झाले आहेत. थाटात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला अनेक मित्रमंडळी तसेच मान्यवरांनी हजेरी लावून त्यांना शुभाशीर्वाद दिले आहेत. लग्नानंतर रिसेप्शनचे खास आयोजन करण्यात आले होते. लग्नाअगोदर दोन दिवसांपासून अल्का कुबल यांच्या घरी ईशानीच्या लग्नाची लगबग सुरू होती. आई वडील दोघेही शुटिंगनिमित्त बाहेर असायचे त्यावेळी ईशानी आणि कस्तुरी तिच्या मामा मामीकडेच जास्त असायची. त्यामुळे त्यांच्याशी खूप घट्ट नाते निर्माण झाले होते.

याचमुळे आपण आता सासरी जाणार या भावनेने ईशानीला आणि तिच्या मामामामीला रडू आले होते. मात्र मी घर सोडून जात असले तरी जवळच जातीये असे म्हणत ईशानीने हा हळवा क्षण सावरण्याचा प्रयत्न केला होता. मेहेंदि आणि हळदीचा सोहळा थाटात साजरा करण्यात आला होता. ईशानी आणि निशांत हे दोघेही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात. निशांत वालिया हा देखील व्यावसायिक पायलट आहे. कामानिमित्त यूएसए, फ्लोरिडा सिटी, मियामी येथे तो वास्तव्यास आहे. मात्र त्याचे कुटुंब दिल्ली येथे स्थायिक आहे.मराठी चित्रपट आणि मालिकांतील अनेक दिग्गज कलाकारांनी वेळात वेळ काढून ह्यांच्या लग्नाला आवर्जून हजेरी इतकाच नव्हे तर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी कलाकांसोबत जुन्या आठवणी शेअर देखील केल्या. जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी सोशिअल मीडियावर लग्नाचे फोटो देखील शेअर केलेले पाहायला मिळत आहेत.