संबंध नसतानाही हा मराठी अभिनेता होतोय बदनाम म्हणतो ” कोणतीही शहानिशा न करता कुंद्रा प्रकरणात माझा.

सोशिअल मीडियावर तुम्ही वाट्टेल तस वाटेल त्याला ट्रोल केलेले पाहिलं असेल पण काल घडलेल्या प्रकारामुळे टीव्ही मीडियाच किती बेजबादार आहे ह्याच दर्शन घडेल. अनेक बातम्या वाहिन्यांनी काल कसलीही शहनिशा न करता फक्त नावात असलेल्या साम्यामुळे मोठा गोंधळ निर्माण केला आहे त्यातून एका मराठी अभिनेत्याला चांगलाच मनस्ताप भोगावा लागत आहे . ह्या मराठी अभिनेत्याचं नाव आहे “उमेश कामत “. चला तर पाहुयात नक्की काय गोंधळ घातलाय न्यूज च्यायनलने ते पाहुयात ….

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा तुरुंगात आहे त्याने काही महिन्यांपूर्वी केलेलं चॅटिंग आणि sms मीडियाच्या हाती मागले आहे. ह्या मध्ये उमेश कामत ह्या व्यक्तीचा उल्लेख आहे पण मीडियाने कशाचीही शहानिशा न करता मराठी अभिनेता उमेश कामत (नाव सारखं असल्यामुळे) ह्याचे फोटो टीव्हीवर दाखवायला सुरवात केलीय. हे पाहून अभिनेता उमेश कामत ह्याला ओळखणाऱ्या संपूर्ण मराठी फिल्म चाहत्यांची झोप उडाली आहे. अभिनेता उमेश कामात ह्याने नुकतीच आज एक पोस्ट शेअर करत ह्याबाबत खुलासा केला आहे तो म्हणतो ” आज राजकुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, ह्या प्रकरणातील एक आरोपी “उमेश कामत” ह्याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी ह्या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकरणामुळे माझी वयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक हानीसाठी या वृत्तवाहिन्यांना जबाबदार धरण्यात येईल. या प्रकरण संबधी मी योग्य ती कायदेशीर कारवाई नक्कीच करेन .. उमेश कामत” ह्या प्रकरणाशी कोणतीही शहानिशा न करता मीडियाने केलेल्या ह्या कृत्याचा मराठी चित्रपट सृष्टी नक्कीच समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही.

अभिनेता उमेश कामत हा अभिनेत्री प्रिया बापट हिचा पती आहे. लवकरच त्याची अजूनही बरसात आहे हि मालिका येतेय. ह्या मालिकेत तो मुक्ता बर्वे हिच्यासोबत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर प्रिया बापट कामत हिची देखील सिटी ऑफ ड्रीम्स 2 हि सिरीज प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. प्रिया आणि उमेश दोघेही मराठी चित्रपट सृष्टीशी निगडित आहे. अनेक सिनेमे आणि मालिका ह्यातून त्यांनी चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मीडियाच्या ह्या भोंगळ कारभारामुळे त्यांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.