Breaking News
Home / ठळक बातम्या / अवघी मराठी सृष्टी हळहळली या प्रसिद्ध कलाकाराचे झाले दुःखद निधन

अवघी मराठी सृष्टी हळहळली या प्रसिद्ध कलाकाराचे झाले दुःखद निधन

“माझा प्रणित दादा गेला”….प्रवीण तरडेचे हे शब्द मराठी सृष्टीला बरेच काही बोलून गेले. प्रवीणच्या ह्या वाक्याने अवघ्या मराठी सृष्टीला धक्का बसल्याचे समोर आले आहे त्याला कारणही तसेच आहे मुळशी पॅटर्न चित्रपट असो वा देऊळबंद हे दोन्ही चित्रपट प्रावीण तरडेच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरले आहेत. या चित्रपटाचे गीतकार, लेखक ,दिग्दर्शक असलेले “प्रणित कुलकर्णी” यांनी नुकताच या जगाचा निरोप घेतला आहे. प्रणित कुलकर्णी यांनी प्रवीण तरडे सोबत देऊळ बंद चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते एवढेच नाही तर या चित्रपटातील गुरू चरित्राचे कर पारायण… हे लोकप्रिय गाणं देखील प्रणितने लिहिलं होतं.

pranit kulkarni
pranit kulkarni

या गाण्याखेरीज आ रा रा खतरनाक, उन ss उनss वठातून …., आभाळा आभाळा अशी गाजलेली गाणी त्याने लिहिली आहेत. “माझा प्रणित दादा गेला…सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला” या वाक्यात पविण तरडेने आपल्या दाटलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांना धक्का बसला असल्याचे म्हटले आहे. तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. साधारण दोन वर्षांपासून प्रणित कुलकर्णी हे कॅन्सरच्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. परंतु त्यांची ही झुंज आज अखेर अपयशी ठरली आहे. नुकतेच त्यांचे को”रो “नाने निधन झाल्याचे समोर येत आहे. प्रणितने वेडिंगचा शिनेमा, हुंटाश असे आणखी काही मराठी चित्रपट साकारले होते. प्रणित कुलकर्णी यांच्या फेसबुकवर तुम्हाला अनेक कवितांचा संग्रह आढळेल.
प्रवीण तरडे सह केदार शिंदे ने देखील प्रणितच्या जाण्याला हळहळ व्यक्त केली आहे….” प्रणीत गेल्याची बातमी समजली.. खुप आठवणी डोळ्यासमोर आल्या.. प्रणीत विषयी लिहीणार काय? अचानक exit मनाला पटली नाही यार प्रणीत..” असे म्हणून केदारने श्रद्धांजली वाहिली आहे. प्रणितचे जाणे मराठी सृष्टीतील कलाकारांना मनाला चटका लावून जाणारे ठरले आहे हे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरूनच समजते आहे….प्रणित कुलकर्णी यांना आमच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *