
मराठी बिग बॉसच्या ३ रा सिजन सुरुवातीला अविष्कार दारव्हेकर आणि स्नेहा वाघ यांच्यामुळे चांगलाच चर्चेत राहिला होता. बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघने सुरेखा कुडची यांच्याकडे अविष्कारच्या वर्तवणुकीबाबत वक्तव्य देखील केलं होतं की अविष्कार मला खूप मारायचा, त्रास द्यायचा. यावरून स्नेहा वाघ प्रेक्षकांची सहानुभूती मिळवताना दिसली. मात्र याबाबत अविष्कारने कधीच कोणाला स्पष्टीकरण दिले नव्हते. आणि कधी कुठे स्नेहाबाबत वाच्यताही केली नव्हती. नुकतीच अविष्कारने मीडियाला एक मुलाखत दिली आहे त्यात तो आपल्या आयुष्यात आलेल्या या कठीण काळाबद्दल बोलताना दिसत आहे. प्रथमच त्याने स्नेहाच्या नात्याबद्दल खुलासा करत सांगितले की…..

आमच्यात जे झालं , आमच्यावर जे आरोप लावले गेले त्याला आम्ही एवढंच ठरवलं होतं की त्यावर उत्तर द्यायचं नाही, माझ्या आईने असं सांगितलं होतं की मुलींच्या विरुद्ध काही बोलायचं नाही…त्यामुळे समोर जे काही घडत होत ते फक्त बघायचं आणि हसायचं या सर्व स्टोरीज पाहून. परंतु या सर्व गोष्टींचा माझ्या करीअरवर खूप मोठा परिणाम झाला. मला माझ्या पहिल्या लग्नाबद्दल काही वाईट वाटत नाहीये. तिनं तीच करिअर केलं तिच्या स्वबळावर तिने यश मिळवलं यात तिनं माझं नाव पण नाही वापरलं तिने जे काही केलं ते तिच्या भरवश्यावर केलं मला नक्कीच या गोष्टीचा अभिमान आहे. आम्ही दोघं वेगळे झाल्यानंतर तिनं काहीच केलं नसतं तर मला त्रास झाला असता पण हो मीडियाला हे का नाही कळत की लग्नात दोघे असतात वेगळे झाल्यावर खूप एकटं पडल्यासारखं वाटलं मी याबाबत कुठं काहीच बोललो नाही हे पाहून आज मला खूप चांगलं वाटतंय. माझ्या आयुष्यात जे घडल ते लोकांसमोर आलंच आहे ह्यावर मी अजून काय प्रतिक्रिया द्यायला हवी होती. या सर्व गोष्टींमुळे लोकं आज मला सपोर्ट करत आहेत.

ती ऐरणीच मला कळली नाही आयुष्याची अशी खेदजनक प्रतिक्रिया देत हे सत्य आहे आणि मला ते स्वीकारावं लागेल आणि काही चुका तुमच्याकडुन आणि दोघांकडूनही होतात पण त्या होणार नाहीत याचा मी प्रयत्न नक्की करेन. पण एका अर्थी माझ्याबाबतीत हे चांगलंच झालं कारण तिच्याबरोबर राहून या इंडस्ट्रीत राहण्यासाठी खूप काही शिकायला मिळालं. तिनं स्वतःला सिद्ध करून दाखवलं की एवढं होऊनही यशाचं शिखर गाठता येतं. जे झालं ते उत्तम झालं देवाच्या जे मनात होतं अगदी तेच झालं…’ त्याच्या ह्या बोलन्यातून तो अगदी शांत स्वभावाचा असल्याचं अनेकदा स्पष्ट झालय. विभक्त होऊनही तो आपल्या पासून वेगळ्या झालेल्या पत्नीचं हितच पाहत असल्याचं दिसून येत. आपण मागे राहिलो आणि तिने स्वबळावर खूप काही दाखवून दिलंय असं तो म्हणाला ह्यातच सर्व काही आलय असं म्हणायला हरकत नाही. असो अभिनेता अविष्कार दारव्हेकर आणि अभिनेत्री स्नेहा वाघ हे वेगळे झाले असले तरी काही दिवसांपुरते बिगबॉसच्या घरात एकत्र राहून किमान थोडे दिवस तरी एकमेकाशी बोलले असं म्हणायला हरकत नाही.