एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या सर्व गंभीर आरोपांवर समीर वानखेडे यांनी हे आरोप खोटे आहेत आणि मी कारवाईला सामोरे जाईल असे मीडियाला स्पष्ट केलं आहे. दरम्यान समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांना देखील मारून टाकू अशा धमक्या दिल्या जात आहेत यावर नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन त्या मीडियाशी बोलताना म्हणाल्या की, “मला मराठी असल्याचा अभिमान असून महाराष्ट्रातुन, देशभरातून पाठिंब्याचे मेसेज येत आहेत पण मला आणि माझ्या परिवाराला आपल्याच राज्यात कोणीतरी त्रास देत आहे, हे वाईट आहे. मला माझ्या राज्यात सुरक्षित वाटायला हवं ना?” अशी खेदजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान समीर वानखेडे यांनी पहिले लग्न केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला याबत क्रांती रेडकरने आपल्या लग्नाचा फोटो शेअर करून मी आणि समीर आम्ही दोघेही हिंदूच आहोत असे म्हटले होते. एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना समीर वानखेडे यांच्या कर्तृत्वाबाबत तिने आदर व्यक्त केला. त्यांना आमच्यासाठी खूप कमी वेळ मिळतो पण मला त्यांचं प्रोफेशन माहीत आहे त्यामुळे मी त्यांच्या कामात कधीच लुडबुड करत नाही, उलट फिरायला कुठे गेलो आणि त्यांना कामासंदर्भात जावं लागलं तर ते पहिलं आपल्या सेवेला प्राधान्य देतात असं तिनं म्हटलं होतं. क्रांती रेडकरच्या या स्पष्टीकरणावर बाहेरच्या राज्यातील लोकांनी देखील समीर वानखेडे यांना आमचा पाठिंबा आहे असेच म्हटले होते. हे सर्व असलं तरी मराठी मालिका आणि चित्रपट अभिनेता आरोह वेलणकर याने क्रांतीला पाठिंबा दर्शवत एक ट्विट केलं आहे त्यात तो म्हणतो की, “क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. सोशल मीडियावरून सुरु असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम अस्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.” असं म्हणत आरोहने क्रांतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मात्र आरोहच्या ट्विट करण्याअगोदर क्रांतीची मैत्रीण आणि मराठी अभिनेत्री सोनाली खरे आणि तिचा पती बीजय आनंद यांनी क्रांतीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे म्हटले आहे. सोनाली खरे पाठोपाठ अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती मेघा धाडे हिने देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे. मराठी सृष्टीतील आणखी बरेचसे कलाकार आता हळूहळू क्रांती रेडकरच्या बाजूने सारसावलेली पाहायला मिळत आहेत. या प्रकरणाला आता आणखी कोणते नवे वळण मिळते हे येत्या काही दिवसातच पाहायला मिळेल. मात्र ह्या क्समुळे पैसा आणि सत्तेत असल्यास आपण काहीही करू शकतो असच पाहायला मिळतंय. ह्या पूर्वी देखील अनेक प्रकरणामध्ये अश्याच प्रकारे अधिकारांना त्रास झालेला पाहायला मिळालाय. मानसिक त्रासाला कंटाळून अभिनेत्री क्रांती रेडकर हिने हि माझी ह्या प्रकरणातली कदाचित हि माझी शेवटची प्रेस कॉन्फेरंस असेल असही म्हणाली आहे.