Breaking News
Home / जरा हटके / अभिनय क्षेत्रापासून दूर असलेले मराठीतील हे ६ प्रसिद्ध कलाकार आजही सर्वांच्या आठवणीत नक्कीच असतील

अभिनय क्षेत्रापासून दूर असलेले मराठीतील हे ६ प्रसिद्ध कलाकार आजही सर्वांच्या आठवणीत नक्कीच असतील

मराठी सृष्टीला आजवर अनेक कलाकार लाभले त्यातील काही कलाकारांनी विनोदी भूमिकेने, सोज्वळ भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीपासून ही कलाकार मंडळी दूर झालेली आहेत. या स्मृतीत असलेल्या मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येत नसलेल्या काही खास कलाकारांबद्दल आज आपण जाणून घेऊयात… 1)आशा काळे – मराठी सृष्टीला लाभलेल्या सोज्वळ अभिनेत्रींपैकी एक म्हणचे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे. आशा काळे यांनी मराठी चित्रपटातून सोज्वळ आणि सात्विक नायिकेच्या भूमिका साकारल्या. ६० ते ८० च्या दशकात त्यांनी गणाने घुंगरू हरवले, गनिमी कावा, चांदणे शिंपीत जा, चोराच्या मनात चांदणे, तांबडी माती,थोरली जाऊ, देवता, बंदीवान मी या संसारी, बायकोचा भाऊ, बाळा गाऊ कशी अंगाई, माहेरची माणसे, संसार, सासुरवाशीण, हा खेळ सावल्यांचा अशा चित्रपटातून त्या महत्वाच्या भूमिका साकारताना दिसल्या. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आशा काळे अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. पती माधव नाईक यांच्या निधनानंतर आशा काळे एकाकी पडल्या.

asha kale and anupama
asha kale and anupama

आज त्यांच्या जवळ जिवाभावाची माणसं नसली तरी मित्रमंडळींमध्ये त्या आपले मन रमवताना दिसतात. गेल्या वर्षी कात्रज येथील व्ही एस अंकलकोटे पाटील यांच्या घरी त्या गेल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबियांशी त्यांचे सख्य आहे. त्यामुळे त्यांच्या चार वर्षांच्या नातवासाठी त्यांनी आपल्या चित्रपटातील अंगाई गीत गायले होते. त्यावेळी आशा काळे अनेक वर्षानंतर प्रेक्षकांच्या समोर आल्या होत्या. 2) अनुपमा- मराठी सृष्टीला अशीच एक सोज्वळ नायिका लाभली ती अनुपमा यांच्या रूपाने. अनुपमा यांचे मूळ नाव रेखा कुलकर्णी. आसावरी या नाटकासाठी मधुसूदन कालेलकर यांनी त्यांना अनुपमा हे नाव दिले पुढे याच नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या.धर्मकन्या, आधार, राजा शिवछत्रपती, देवमाणूस, नाते जडले दोन जीवांचे, तांबडी माती या आणि अशा अनेक चित्रपटातून त्यांनी एक काळ नायिका म्हणून गाजवला होता.डॉ दिलीप धारकर यांच्याशी प्रेमविवाह केल्यानंतर त्या परदेशात शिकागो येथे स्थायिक झाल्या. अभिनयापासून आणि मराठी सृष्टीपासून त्या खूप दूर असल्या तरी परदेशातील मुलांना एकत्रित करून त्यांनी नाटक बसवले होते. या नाटकाच्या माध्यमातून अनुपमा प्रकाशझोतात आल्या होत्या.

bhalchandra kulkarni and suresh bhagwat
bhalchandra kulkarni and suresh bhagwat

3)भालचंद्र कुलकर्णी- मराठी चित्रपट सृष्टीत सहाय्यक भूमिका निभावणार भालचंद्र कुलकर्णी हे ज्येष्ठ कलाकार तुम्हाला नक्कीच आठवणीत असतील. गेल्या चार ते पाच दशकांच्या कारकिर्दीत असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई , सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक चित्रपटातून भालचंद्र कुलकर्णी यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. सहाय्यक भूमिकेसाठी भालचंद्र कुलकर्णी यांना ओळखले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रेक्षकांच्या समोर आले होते.
4)सुरेश भागवत- मराठी सृष्टीला लाभलेला विनोदी कलाकार म्हटले तर अनेक नावं घेता येतील. त्यातीलच एक काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे सुरेश भागवत. डोळ्यात मोठ्या भिंगाचा चष्मा लावून या कलाकाराने नुसत्या आपल्या दिसण्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. चाळ नावाची वाचाळ वस्ती, गुपचूप गुपचूप, प्रेम करूया खुल्लम खुल्ला अशा चित्रपटांमधून सुरेश भागवत यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. आज सुरेश भागवत मराठी सृष्टीपासून खूप दूर आहेत मात्र मुलं, नातवंड, मित्रमंडळी यांच्यासोबत ते वेळ घालवताना दिसतात.

actor prakash bhende with wife uma bhende
actor prakash bhende with wife uma bhende

5) प्रकाश भेंडे – दिग्दर्शक, अभिनेते प्रकाश भेंडे हे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे या प्रकाश भेंडे यांच्या पत्नी. आई थोर तुझे उपकार, आपण यांना पाहिलंत का, नाते जडले दोन जीवांचे, चिमुकला पाहुणा, अनोळखी, भालू अशा चित्रपटातून ते काशी सहाय्यक तर कधी मुख्य भूमिका, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटाच्या सहनायिकेसोबत त्यांचे प्रेम जुळले. उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांना दोन मुलं आहेत ते दोघेही मराठी सृष्टीशी जोडलेले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश भेंडे मराठी सृष्टीपासून दूर असलेले पाहायला मिळतात. 6) दया डोंगरे – मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेली खाष्ट सासू म्हणून अनेक अभिनेत्रींनी दबदबा निर्माण केला होता त्यातील एक म्हणजे अभिनेत्री दया डोंगरे होय. खट्याळ सासू नाठाळ सून, संकेत मिलनाचा, मंतरलेली चैत्रवेल, मायबाप, उंबरठा अशा अनेक चित्रपट मालिका तसेच नाटकांमधून त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या. १९९० साली झालेल्या अँड्रॉपियान या डोळ्यांच्या आजारामुळे दया डोंगरे यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. मात्र आजही त्यांची नाटक पाहण्याची हौस त्या पूर्ण करताना दिसतात.

actress daya dongre
actress daya dongre

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *