Breaking News
Home / जरा हटके / अभिनेता नागेश भोसले यांची पत्नी आहे अभिनेत्री आता अभिनया व्यतिरिक्त करतात हे कौतुकास्पद काम

अभिनेता नागेश भोसले यांची पत्नी आहे अभिनेत्री आता अभिनया व्यतिरिक्त करतात हे कौतुकास्पद काम

चित्रपट असो वा मालिका नायकाईतकीच खलनायकाची भूमिका तितकीच महत्वाची मानली जाते. असाच एक आपल्या सहजसुंदर अभिनयाने खलनायक साकारणारा अभिनेता नागेश भोसले यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. नागेश भोसले यांनी देवयानी मालिकेत साकारलेली आबासाहेब विखे पाटीलची भूमिका खूपच गाजली होती. नागेश भोसले यांना सुरुवातीच्या काळात सत्यदेव दुबे, विजया मेहता या दिग्गज कलाकारांचा सहवास लाभला होता. रंगभूमीवर त्यांच्यासोबत काम करण्याची त्यांना नामी संधी मिळाली होती.

actress joy bhosle
actress joy bhosle

नाटक, दूरदर्शनवरील मालिका, चिंटू 2, प्यार वाली लव्ह स्टोरी, दुनियादारी, धग, गावठी, योद्धा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटासोबतच त्यांनी शूल , सरकार, क्यूँ की, डी, आखरी डिसीजन, दम, बरदाश्त यासारखे हिंदी चित्रपट अभिनित केले आहेत. बऱ्याचशा चित्रपटातून त्यांनी खलनायकी ढंगाच्याच भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे मराठी सृष्टीतील खलनायक अशी एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. नागेश भोसले यांनी पन्हाळा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, गोष्ट छोटी डोंगराएवढी या दर्जेदार चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. लवकरच ते तमाशा या आगामी चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नागेश भोसले यांच्या पत्नी जॉय भोसले या देखील मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. विजय कदम सोबत त्यांनी सहकलाकाराची भूमिका साकारली होती. ‘जॉय कलामंच’ या त्यांच्या निर्मिती संस्थेतून त्यांनी ‘ कळत नकळत’, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. एवढेच नाही तर जॉय भोसले या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली होती.

actor nagesh bhosle family
actor nagesh bhosle family

राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्या राजकारणात सामाजिक संस्थेत उतरल्या. लहानपणापासून मुंबईची झोपडपट्टी आहे तशीच आहे त्यात कुठलीही सुधारणा झाली नाही याच हेतूने समाजात काहीतरी बदल घडवून आणावेत म्हणून त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली असली तरी आजही त्या सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत. जॉय भोसले आणि नागेश भोसले यांना दोन अपत्ये आहेत. कलाकारांची मुले कलाक्षेत्रातच येतात असा एक समज आहे मात्र त्यांची दोन्ही मुले कलाक्षेत्रापासून खूप दूर आहेत. नागेश भोसले यांची कन्या “कुहू भोसले” ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. कुहू भोसले आपल्या फिटनेसला पहिले प्राधान्य देताना दिसते. अँथलेट, वुमन्स बॉडिबिल्डिर आहे या क्षेत्रात तीने आपला जम बसवला आहे. २०२१ साली स्त्री शक्ती पुरस्काराने कुहूला सन्मानित करण्यात आले होते.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.