जरा हटके

महेश टिळेकरानीं सुनावले खडेबोल म्हणाले बुद्धीला गंज लागला म्हणून की काय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा फोटो देऊन

आजकाल अनेक माध्यमे न्युज देताना त्याची शहनिशा करण्याचे कष्ठ न्युजवाले घेताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिचा पती राजकृन्द्राच्या न्युजमध्ये फक्त नावात असलेल्या साम्यामुळे अभिनेता उमेश कामत ह्याचे फोटो प्रकाशित केले गेले होते. जेंव्हा ह्याचं सत्य उघड झालं तेंव्हा मीडियाने आपल्याकडून चूक झाली असल्याची कबुली किंवा माफी देखील मागितली नव्हती. आता बऱ्याच दिवसांपासून सोशिअल मीडियावर रंगत असलेला ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना ह्यांच्या फोटोवर टाकलेल्या चुकीच्या मजकुरावर प्रसिद्ध डायरेक्टर आणि प्रोड्युसर महेश टिळेकर ह्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

actress sulochana
actress sulochana

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना ताईंचा तो फोटो प्रसिद्ध करणाऱ्या मीडियाला खेडेबोल सुनावताना महेश टिळेकर म्हणतात ” गांजा ओढून दारू पिऊन बातम्या देणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे विश्वासाने पाहिले जाते असे स्तंभ जर खोट्या बातम्या देऊन इतरांना स्तंभित करत असतील तर हाताची घडी तोंडावर बोट ठेवत गप्प बसून राहायचं का? हे काही न्यूजवाले बुद्धीला गंज लागला म्हणून की काय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा फोटो देऊन त्यावर माहिती मात्र मुकपट(silent movie) चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना, ज्या रुबी मायरस Ruby Myers या नावाने ओळखल्या जात होत्या,ज्यांना 1973 साली दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांची माहिती माहिती देण्याचं धाडस कसं करू शकतात.मराठी हिंदी सिनेमांमध्ये नायिका ते चरित्र अभिनेत्री अश्या भूमिका साकारणाऱ्या सुलोचना दीदी जनतेला, सिने रसिकांना अजूनही माहीत आहे.मग तरीही ब्रेकिंग न्यूज, सणसणीत काहीतरी देण्याच्या चढाओढीत असणारे हे काही पत्रकार गांजा ओढून की दारू ढोसून छाती ठोकपणे अश्या बातम्या देतात? … महेश टिळेकर

director mahesh tilekar
director mahesh tilekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button