Breaking News
Home / जरा हटके / या ३ बालकलाकारांना ओळखलंत? आज आहेत मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते

या ३ बालकलाकारांना ओळखलंत? आज आहेत मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते

लहानपणापासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केलेले कलाकार पुढे जाऊन चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी होऊन अभिनयाची आवड जोपासत असताना चित्रपटात काम करण्याची संधी अनेकांना मिळते यातूनच पुढे जाऊन हे कलाकार चित्रपट आणि मालिकांमध्ये स्थिरस्थावर होतात. मराठी सृष्टीत मानाचे स्थान मिळणाऱ्या या यादीतील तीन बाल कलाकारांबद्दल आज जाणून घेऊयात… छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून प्रवेश करणारे महेश कोठारे यांची कारकीर्द देखील अशीच म्हणावी लागेल . अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली होती. “तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है” हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं विशेष लोकप्रिय ठरलं होतं.

actor mahesh kothare
actor mahesh kothare

महेश कोठारे यांनी वकिलीची पदवी मिळवली व काही वर्षे त्यांनी वकिली देखील केली. बालकलाकार म्हणून ओळख मिळवून त्यानी चित्रपटात नायक म्हणून पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच घरचा भेदी, लेक चालली सासरला या चित्रपटातून खलनायकाचे पात्र साकारण्याचे साहस त्यांनी केले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ हे चित्रपट करत असताना दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली. कुबड्या खविस, कवट्या महाकाळ, तात्या विंचू, गिधाड गॅंग अशी चित्रपटातील हटके नावाची पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. सध्या महेश कोठारे मालिका दिग्दर्शनाकडे वळले आहेत. त्यांच्या मालिकांमधून त्यांनी अनेक नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक अशी ओळख त्यांनी जपली आहे.

actor swapnil joshi
actor swapnil joshi

स्वप्नील जोशी हा देखील हिंदी मालिकांमधून बालकलाकार म्हणून नाव लौकिक करताना दिसला. रामायण मालिकेतून स्वप्नील कुशची भूमिका गाजवताना दिसला. श्रीकृष्णा मालिकेमुळे स्वप्नीलला हिंदी सृष्टीत मोठी लोकप्रियता मिळाली. सजन रे झूठ मत बोलो, गोलमाल है भाई सब गोलमाल है , आँचल की छाव मे अशा हिंदी मालिकेतून तो महत्वाच्या भूमिकेत दिसला. हिंदी मालिकेनंतर स्वप्नीलने आपली पाऊले मराठी सृष्टीकडे वळवली. दुनियादारी, तू ही रे, मितवा, मुंबई पुणे मुंबई, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा मालिका आणि चित्रपटातून त्याला मोठी लोकप्रियता मिळत गेली. तू तेव्हा तशी या मालिकेत तो सौरभचे पात्र साकारत आहे. स्वप्नीलचा छोट्या पडद्यावरचा वावर प्रेक्षकांना विशेष भावला आहे. आज मराठी मालिकेतील टॉपच्या नायकाच्या यादीत त्याचेही नववा घेतले जाते.

actor shekhar phadke
actor shekhar phadke

बालकलाकार ते विनोदी अभिनेता आणि तेवढाच तगडा खलनायक अशा भूमिका खूप कमी जणांच्या वाट्याला येतात. शेखर फडके हा त्यातलाच एक. सातवीत असताना आई पाहिजे चित्रपटात अभिनेते रमेश भाटकर यांच्या बालपणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ही भूमिका छोटीशी जरी असली तरी खलनायक साकारायची आवड इथूनच त्याच्यात निर्माण झाली. त्यानंतर खलनायकी ढंगाच्या भूमिकेनी त्याची पाठ सोडली नाही विठू माऊली मालिका असो वा सरस्वती मालिका यातून त्याने साकारलेला खलनायक काहीशा विनोदी वलयाचा दिसला. सरस्वती मधला भिकुमामा तर त्याने अतिशय सुरेख रंगवलेला पहायला मिळाला होता. फुलाला सुगंध मातीचा, पिंकीचा विजय असो अशा मालिकांमधून शेखर छोट्या छोट्या भूमिकेत दिसतो. गजरा मोहोब्बतवाला या नाटकातून शेखर दिग्दर्शकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.