सध्या हिंदीसह मराठी सृष्टीतही लग्नसोहळे सुरू झालेले आहेत. लग्नघर म्हणत भगरे गुरुजींची मुलगी म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुल हिने भावाच्या लग्नाची लगबग सोशल मीडियावर शेअर केली होती. तर मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा सदस्य अभिनेता निखिल राजेशिर्के ह्याची लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज शुक्रवारी सकाळी निखीलची हळद पार पडली. राहत्या घरी हा समारंभ पार पडला.
एप्रिल महिन्यात पाडव्याच्या दिवशी निखिलचा साखरपुडा पार पडला होता त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यात तो लग्नबांधनात अडकणार आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत निखिल राजेशिर्के याने परीच्या बाबांची भूमिका साकारली होती. अजूनही बरसात आहे, तुला शिकवीन चांगलाच धडा, रंग माझा वेगळा अशा मालिकेत तो महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला आहे.
काही दिवसांपूर्वी निखिलने त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत प्रिवेडिंग फोटोशूट केले होते. ब्लॅक कलरचा सूट आणि लाल रंगाच्या साडीत या कपलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज त्यांच्या लग्ना अगोदरच्या विधींना सुरुवात झाली असून ते दोघेही आता लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. या लग्नाला कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.