बिग बॉसच्या चावडीवर मीरा ह्यावेळी देखील मांजरेकरांच्या टार्गेटवर होती. गायत्री आणि मीरा तसेच जय आणि गायत्री यांच्यातील वाद मात्र अधिकच वाढत जाताना पाहायला मिळाले. प्रेक्षकांच्या अतरंगी मागणीत मीरा आणि गायत्री यांनी मै ‘तेरी दुश्मन या गाण्यावर नृत्य केले मात्र हे गाणं या दोघीना शब्दशः लागू पडलेलं पाहायला मिळालं. बिग बॉसच्या घरातून ह्या आठवड्यात कोणीच घराबाहेर पडलं नाही. मीरा सुरुवातीपासूनच ए टीममधून प्रत्येक टास्कमध्ये छान खेळत होती. जय आणि उत्कर्ष यांच्यासोबत तिची खूप चांगली मैत्री देखील झाली होती मात्र ह्या आठवड्यात एलिमीनेशन राउंडमधून मिराला घराबाहेर पडावे लागणार असल्याचे जाहीर होताच रडतरडत ती बाहेर आली मात्र तिथेच तिला ‘फसवलं’ असल्याच एक पाकीट मिळत आणि ती घराबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट होते.

मीरा तू घराबाहेर कशी जाऊ शकतेस असं म्हणत मांजरेकरांनी ह्यावेळी एलिमीनेशन मध्ये कोणीच बाहेर जाणार नसल्याचे सांगितले. या गोष्टीवरून जय आणि उत्कर्षला मीरा सेफ असल्याचा खूप आनंद होतो. ह्या आठवड्यात कोणीच एलिमीनेट झालं नसलं तरी येत्या काही दिवसात बिग बॉसच्या घरात मोठे ट्विस्ट आलेले पाहायला मिळणार आहे. लवकरच स्नेहा वाघ , आदिश वैद्य आणि तृप्ती ताई बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. घराबाहेर पडलेले हे सदस्य आता घरातील सदस्यांना खरं खोटं सुनावणार आहेत. स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांच्यात खूप चांगली मैत्री होती मात्र जय प्रत्यक्षात कसा आहे हे ती पाहून आलेली आहे. त्यामुळे आपल्या विरोधात ज्यांनी ज्यांनी कटकारस्थान रचली आहेत त्यांचा ती समाचार घेताना दिसत आहे. आपलेच मित्र आपल्या मागून इज्जत काढतात असं वक्तव्य ती कोणाच्या बाबतीत करत आहे हे देखील लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बाहेर पडलेले सदस्य काय काय खुलासा करणार तसेच आपल्या मित्रांना कुठले सल्ले देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. स्नेहा वाघने दणक्यात घेतलेली एन्ट्री प्रेक्षकांना मात्र गोंधळात पाडणारी आहे त्यासाठी उद्याचा भाग प्रेक्षकांसाठी तितकाच रंजक ठरणार आहे.