दोन दिवसांपूर्वी अयोध्येत रामलीला सादर करण्यात आली. दूरदर्शन वाहिनीवर या सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण सादर करण्यात आले होते. भव्यदिव्य अशा ह्या महाकाव्याचे सादरीकरण अनेक कलाकारांच्या अभिनयाने चांगलेच रंगले होते. नवरात्रीचे औचित्य साधून अयोध्यातील शरयू नदीच्या किनारी एका मैदानात रामलीलाचे सादरीकरण करण्यात आले होते. यात मराठमोळी अभिनेत्री ‘भाग्यश्री पटवर्धन’ हिने सीता मातेची भूमिका निभावली होती. या भूमिकेबाबत भाग्यश्री म्हणते की माझ्या जीवनातील एक ईच्छा आज पूर्ण झाली आहे. सीता मातेच्या गेटअपमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत होती. तिथल्या प्रेक्षकांनी देखील भाग्यश्रीला पाहून तिचे खूप कौतुक केले होते.

भाग्यश्री सोबत बॉलिवूडचे आणखी बरेचसे कलाकार ह्या सोहळ्यात एकत्रित झळकले हिते. दूरदर्शन वाहिनीवर रामलीला लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आली होती त्यावेळी जगभरातील तब्बल १९ करोड लोकांनी हा सोहळा पाहण्याचा आनंद लुटला होता. त्यामुळे दूरदर्शन वाहिनीचे अनेकांनी आभार मानले आहेत. हा सोहळा सुरू होण्याअगोदर भाग्यश्रीने हनुमान गढीचे दर्शन घेतले होते ‘ह्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आमची यात्रा सुरू होऊ शकत नाही’ असे तिने म्हटले होते. भाग्यश्रीने थलैवी या चित्रपटात जयललिताच्या आईची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. लवकरच ती पूजा हेगडे आणि प्रभासची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राधे श्याम’ या चित्रपटात झळकणार आहे त्यामुळे भाग्यश्री सध्या आपल्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. या बिझी शेड्युलमधून वेळ काढून ती आपल्या फिटनेसकडे देखील लक्ष्य केंद्रित करताना दिसते. मैने प्यार किया या चित्रपटात तिने सलमान खान सोबत काम केले होते. तेव्हाची भाग्यश्री आणि इतकी वर्षे उलटूनही आता दिसणारी भाग्यश्री यात फारसा फरक जाणवून येत नाही. उलट दिवसेंदिवस तिच्या सौंदर्यात अधिकच भर होताना दिसत आहे.