ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी एका कार्यक्रमात वक्ता म्हणून हजेरी लावली होती . यावेळी आजकालच्या टीव्ही मालिकांबाबत त्यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. बहुतेक मालिकांना कुठलताच कथानकाचा आधार नसतो. मूळ कथानकाला वेगवेगळे फाटे देऊन ती मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या माथी मारली जाते. अशा सुमार मालिकांना आळा घालण्यासाठी प्रेक्षकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे अशा स्वरूपाचे मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे. सुमार मालिका त्यामुळे दर्जाहीन लेखक, दिग्दर्शक आणि नट प्रेक्षकांच्या समोर आणल्या जातात.

एका कार्यक्रमात बोलत असताना विक्रम गोखले यांनी मालिकांच्या निवडीसंदर्भात प्रेक्षकांना आवाहन करत म्हटले आहे की, प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणे बंद केले पाहिजे. प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहावा. तसेच त्यांनी भिकार सीरिअल पाहणे बंद करावे. आपण काय पाहतोय यात काही बुद्धिजीवी आहे का? मालिकांमधून काही वैचारिक मिळत नसेल तर तुमचा वेळ कशाला वाया घालवताय, अशा मालिका बंद करा , रिमोट तुमच्या हातात आहे. तुम्ही पाहणारच नसाल तर ते तयारच करणार नाहीत त्यानंतर ते चांगलं करण्याच्या मागे लागतील. ज्याला कसलाच अर्थ नाही अशा मालिका पाहून असे सगळे कलाविष्कार बघून तुम्हाला काय मिळतं? तुम्हाला पाहून अंतर्मुख होणारा नाटक , सिनेमा, अभिनय असेल तर ते महत्वाचं आहे. मालिका म्हणजे खेळण्यासारख्या झाल्या आहेत. घरातली कामे आटोपताना, मुलांना खाऊ घालत असताना ह्या मालिका पहिल्या जातात त्यातून आपलं काय मनोरंजन होणार , चॅनलवाले देखील अशाच मालिका वाढवण्याचे काम करत असतात, घाल पीठ घाल पाणी.

चांगलं काय आहे ते हुडकून हुडकून बघा. बटणं दाबली की हजार चॅनल मिळतात त्यातील काय चांगलं आहे ते शोधून काढले की आपला हेतू साध्य होईल. त्यानंतर चॅनलवाले देखील चांगले दिग्दर्शक शोधतील चांगले नट पाहायला मिळतील, चांगले लेखक येतील. चांगलं काय आहे याचा शोध घेतला की भिकार मालिका आपोआप बंद होतील. उत्कृष्ट पहा, उत्कृष्ट अनुभवा, उत्कृष्ट वाचा, तुमच्या हातात रिमोट आहे पण ते होत नाही…तुम्हीच ह्या भिकार मालिका पाहणे बंद करा असे परखड मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे आणि प्रेक्षकांना आवाहन करत भिकार मालिका पाहणे बंद करा असे म्हटले आहे.