नुकतीच दिवाळी स्पेशल ‘शॉपर्स टॉप’ ची ऍड प्रसिद्ध झाली आहे या जाहिरातीत झळकणारी ही मुलगी मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी आहे. या व्यावसायिक जाहिरातीतुन अभिनेत्रीच्या मुलीने कलाक्षेत्रात पदार्पण केलेले पाहायला मिळत आहे. जाहिरातीत झळकणाऱ्या ह्या मुलीचे नाव आहे “सई गोडबोले”. सई गोडबोले ही मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची कन्या आहे. किशोरी गोडबोले यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच मराठी आणि हिंदी मालिका अभिनित केल्या आहेत. मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत. मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडलक्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी, मेरे साई यासारख्या हिंदी मराठी मालिका किशोरी गोडबोले यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत.

या सोबत काही नावाजलेले मराठी चित्रपट जसे फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन हे चित्रपट त्यांनी गाजवले आहेत. सईचे वडील सचिन गोडबोले हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. दादर येथे त्यांचे गोडबोले स्टोअर्स असून त्यातून त्यांच्या दिवाळी फराळाला अगदी परदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. सचिन आणि किशोरी गोडबोले यांना सई आणि गौरी या दोन मुली आहेत. किशोरी गोडबोले सध्या मराठी सृष्टीत फार कमी दिसत असल्या तरी हिंदी मालिकेत त्यांनी आपला चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. मेरे साई या हिंदी मालिकेत त्यांनी बायजा माँ ची भूमिका बजावली आहे. किशोरी गोडबोले यांची लेक सई गोडबोले आईप्रमाणे अभिनय क्षेत्रात येण्यास सज्ज झालेली पाहायला मिळते. सईला वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याची आवड आहे शिवाय वडिलांना गोडबोले स्टोअर्स सांभाळण्यास देखील मदत करताना दिसते. याशिवाय सई परदेशी भाषांचा उच्चार देखील सराईतपणे म्हणते अनेकदा यासंदर्भातल्या तिच्या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळते. सई आता आईच्या पावलावर पाऊल टाकत कला सृष्टीत दाखल झाली आहे. लवकरच ती मराठी चित्रपट किंवा मालिकेतूनही पाहायला मिळो हीच एक सदिच्छा आणि जाहिरात क्षेत्रात पदार्पणासाठी अभिनंदन!!!