आसाम-मिझोराम सिमेवर गोळी आणि दगडफेकीत अनेक जवान शाहिद झाले तर काही गंभीर जखमी देखील आहेत त्यात जखमी झालेले महाराष्ट्रीयन आयपीएस जवान वैभव निंबाळकर ह्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. आयपीएस जवान वैभव निंबाळकर हे मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ह्याचे भाऊ आहेत. आपल्या भावाला गोळी लागले हे ऐकून त्यांच्या पूर्ण कुटुंबाला धक्का बसला. नुकतीच उर्मिलाने आपल्या भावासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व भारतवासीयांचे आभार मानले आहेत ती म्हणते” सगळं उत्तम चालू असताना सकारात्मक राहणं, प्रार्थना म्हणणं वेगळं आणि ‘वैभवला गोळी लागलीय’ हे वाक्य ऐकायला मिळाल्यानंतर..

‘ सगळं नीट होणार’ हा विचार मनात येणं वेगळं! काय झालं, कुठुन झालं, कोणत्या मशिन गननं झालं सगळं दिड दिवसांत एवढ्यावेळा कानावर आलंय पण खरं सांगु, मला आणि माझ्या घरच्यांना फक्त तो सुखरुप असावा, एवढीच आशा लागून राहिली होती. त्यात माझे प्रेग्नन्सीचे ९ महिने पु्र्ण झाल्यामुळे आता कधीही हॅास्पीटल गाठावं लागणार असल्यामुळे, मला ही बातमी सगळ्यात शेवटी सांगण्यात आली. बाळांनाही आपण पॅनिक झालेलो कळतो आणि तेही मग पॅनिक होतात. सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपुर्ण विश्वासाने आम्ही भरपुर प्रार्थना म्हणालो. यशस्वी शस्त्रक्रिया पार पडून vaibhavn ips आता अगदी सुखरुप आहे ती आणि कुणाकुणाची कृतज्ञता व्यक्त करु? माझा भाऊ vaibhavn ips ला आसाम-मिझोराम सिमेवर गोळी लागल्यानंतर, त्याची सुखरुप सर्जरी होऊन त्याला आराम लाभेपर्यंत पाऊलो पाऊली सद्गुरु रुपात अनेक माणसे मदतीसाठी धावली! एअर फोर्सच्या स्पेशल एअर ॲम्ब्युलन्सने त्याला मुंबईला आणण्यापासून ते, आसाम पोलिस, आसाम सरकार, मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार, कोकिलाबेन अंबानी हॅास्पिटलचा संपुर्ण स्टाफ, डॅाक्टारांची फौज, vaibhavn ips चे सगळे अधिकारी-मित्र-बॅचमेटस्, वरिष्ठ अधिकारी, नामधारक, त्याच्या तब्ब्येतीसाठी प्रार्थना म्हणणारे तुम्ही सर्व..या संपुर्ण प्रक्रियेत माहित असलेले आणि नसलेले कित्तीतरी मदतीचे हात धावून आले. म्हणूनच मी आणि माझं संपुर्ण कुटुंब तुमचे आयुष्यभराचे ऋुणी आहोत.
