प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगावकर ह्यांच्या पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर ह्यांच्या बाबतीत नुकतीच एक घटना घडलीय. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करून एनजीओला आर्थिक मदत करताना घडलेल्या वाईट अनुभवाबाबत उलगडा केला आहे. अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर ह्यांनी काही दिवसापूर्वी एका एनजीओला आर्थिक मदत केली होती पण ती रक्कम त्यांना मिळाली कि नाही हे जेंव्हा चेक करण्यासाठी त्यांनी त्या संस्थेला फोन केला तेंव्हा त्या फसल्या गेल्या असल्याचं समजलं. हे नक्की काय प्रकरण होत सविस्तर पाहुयात…

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या ” का एनजीओला मी आर्थिक मदत केली होती. काही रक्कम मी त्या एनजीओच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली होती. त्यानंतर सक्सेसफुल असा मेसेज आल्यानंतर काही वेळाने मला त्या एनजीओकडून रक्कम मिळाली असल्याचा मेसेज आला होता. माझ्या बँकेच्या खात्यातूनही ती रक्कम डेबिट झाली असल्याचा मला मेसेज आला. परंतु याबाबत चौकशी करावी म्हणून त्यांनी त्या एनजीओला फोनवरून संपर्क केला. त्यात अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात ती रक्कम आली नसल्याचा खुलासा झाला. मी देऊ केलेली मदत दुसऱ्याच कोणाच्या खात्यात गेली असावी असं त्यांचं म्हणणं आहे. मी याबाबत फसली गेली असून यातून मी आता चांगलाच धडा घेतला आहे.” घाईघाईत आपली ही मदत दुसऱ्याच कोणाला पोहोचू नये या हेतूने त्यांनी इतरांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. असे प्रकार अनेकांच्या बाबतीत घडताना पाहायला मिळतात. कोणालाही पैसे ट्रान्सफर करताना किमान दोनदा तरी क्रोस चेक करणं गरजेचं असतं.

शिवाय ट्रांसफर केलेल्या व्यक्तीला ते पैसे मिळाले कि नाही ह्याची शहानिशा देखील करणे गरजेचे असते. पैसे समोरील व्यक्तीला मिळाले नसतील तर त्वरित बँकेत जाऊन शहनिशा करून पैसे परत मिळावे ह्यासाठी रीतसर फॉर्म भरावा. पैसे चुकून दुसऱ्याच कोणाला मिळाले आणि त्यांनी ते काढून घेतले तर अश्या परिस्तिथीत बँक काहीही मदत करू शकत नाही कारण ते पैसे तुम्ही स्वतःने त्याच्या खात्यात टाकलेले असतात. जास्तीत जास्त बँक अश्या प्रकरणात समोरच्या व्यक्तीला पैसे परत करण्यासाठी विनंती करू शकते. ह्याव्यतिरिक्त तुम्हाला बँकेकडून काहीही मदत मिळत नाही. त्यामुळे मित्रानो सतर्क राहा डिजिटल जमान्यात किमान दोनदा तरी समोरील व्यक्तीच नाव अकाउंट नंबर चेक कराच. स्वतःचा वेळ आणि अश्या प्रकारातून होणार फुकटचा मनस्ताप आणि आर्थिक हानी पासून वाचा.