बॉलीवूड अभिनेत्री सुप्रिया हिला मराठमोळी म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. अरे हिने कधी मराठीत काम केलं असा सवाल अनेकांना पडला असेल. पण मित्रांनो तुम्हाला कदाचित माहित नसेल अभिनेत्री सुप्रिया हीच पूर्ण नाव सुप्रिया कर्णिक असं आहे. मुंबईत तिचा जन्म झाला. १९९६ सालच्या तिसरा डोळा ह्या मराठी मालिकेत त्या अभिनेते रमेश भाटकर ह्यांच्यासोबत झळकल्या होत्या. ह्या मालिकेमुळेच त्यांना प्रसिद्धी मिळाली होती त्यानंतर त्या अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांत झळकल्या.

अभिनेत्री सुप्रिया कर्णिक ह्या मुंबईतच मोठ्या झाल्या. आई वडील आणि दोन मोठ्या बहिणी असा त्यांचं छोटंसं कुटुंब. लहानपणापासूनच त्या खूप डॅशिंग होत्या. दोघी बहिणी मोठ्या असल्या तरी कुणी त्यांची छेड काढली तर ही सुप्रिया त्यांच्या मदतीला धावून जायची त्यामुळे सुरुवातीपासूनच सुप्रिया टॉम बॉय म्हणून ओळखली जायची. दहावी नंतर सुप्रियाने मुलांचे ट्युशन घेतले, दुकानात काम केले, टायपिस्ट, शेअर मार्केट, रिअल इस्टेटमध्येही काम केले. एवढेच नाही तर टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअरिंग अशी सर्व कामे केली. पुढे सौदी अरेबियाला काही वर्षे बुरखा घालून एअर होस्टेसचे काम केले. मात्र तेथील कमला कंटाळून त्या पुन्हा भारतात आल्या. पुन्हा मालिकांत काम करण्याची इच्छा झाली आणि काम मिळालं देखील. शांती, वो रेहनेवाली मेहलोंकी, कानून, तेहकीकात अश्या मालिकांतून त्या झळकल्या. तर बेवफा, राजा हिंदुस्थानी, यादे, जोडी नंबर १, ताल, जिस देश मी गंगा रहता है, वेलकम बॅक अश्या जवळपास ५० हुन अधिक हिंदी चित्रपटांत त्या झळकल्या ह्यामुळेच त्या आज बॉलीवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. लेक लाडकी ह्या मराठी चित्रपटात देखील त्या झळकल्या.

इतकं असूनही आज अभिनेत्री सुप्रिया कर्णिक ह्या अविवाहित आहेत. याचे कारण तिने एका मुलाखतीत दिले होते, अभिनेत्री असली म्हणून काय झालं आपला जोडीदार आपण ज्याच्यावर प्रेम करावं असा माणूस प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात हवा असतो. सुप्रिया दोन वेळा प्रेमात पडली मात्र दोन्ही वेळेला तिची फसवणूकच झाली. या फसवणुकीमुळे मी त्यांना चोप देऊन लोळवलं देखील होतं असं ती म्हणते. एकदा चुकलेल्या माणसाला मी कधीच क्षमा करत नाही असे ती त्या मुलाखतीत म्हणाली होती. त्यानंतर मात्र लग्नाचा विषय देखील बाजूला होत गेला. आज ती अभिनयापासून थोडी दूर झालेली पाहायला मिळते. काही वर्षांपासून त्या अध्यात्माकडे वळल्या आहेत. अनेक तरुण तरुणींना त्या अध्यात्माचे धडे देखील देताना पहायला मिळतात. मॉडर्न राहूनही आध्यात्म जपणारी मराठमोळी सुप्रिया कर्णिक ह्यामुळेच आज पुन्हा चर्चेत आल्या आहेत. चित्रपटात काम मिळवण्यासाठी तिने कधीच कोणापुढे हात पसरले नाहीत. जे काम मला योग्य वाटतं ते मी मन लावून करते त्यामुळे वाईट मार्ग निवडायचा कधी प्रश्नच आला नाही हेच धोरण ठेऊन चंदेरी दुनियेत आज ती आपले अस्तित्व टिकवून ठेऊ शकली आहे असं त्या म्हणतात.