
मराठी बिग बॉसच्या घरात रोज नवनवे वाद घडताना दिसत आहेत. नुकत्याच एका टास्कमध्ये विशाल आणि विकास उत्कर्षला खेचताना दिसले त्यावेळी उत्कर्षच्या डोक्याला मुका मार लागला होता. यावरून अनेकांनी विकास आणि विशालची चूक असल्याचे म्हटले आहे तर अनेकांनी विशाल आणि विकासला पाठींबा दर्शवला आहे. तुम्ही योग्य खेळत आहात आणि आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे. तर तिकडे सोनाली आणि विशाल यांच्यात नुकताच एक वाद झालेला पाहायला मिळतो आहे. माझी बाजू न घेतल्याने सोनाली विशालला जाब विचारत आहे.

मी तुझ्याबाजूने नेहमी बोलते मग त्या बदल्यात तुही माझी बाजू घ्यावीस असं ती विशालला सांगते. त्यावर विशाल देखील मी नेहमीच तुझी बाजू घेतो असं म्हणतो. तू दुसऱ्या टीमसारखं माझ्या विरुद्ध का बोललास माझं नाव का घेतलंस ? असा प्रश्न सोनाली त्याला विचारते…उत्कर्षणे माझी बाजू घेतली असं सोनाली म्हणताच विशाल तिला थांबवतो आणि म्हणतो की माझं आणि उत्कर्षचं मत वेगळं असू शकतं….विशालच्या ह्या मतावर सोनालीने नाराजी दर्शवली आहे आणि विशालच्या वागण्यावरून ती भावुक देखील झालेली दिसत आहे. पहिल्या आठवड्यात सुद्धा माझा आवाज मोठा आहे असं सगळ्यांनी म्हटलं पण तू फालतू रिजन दिलंस असं सोनाली म्हटल्यावर विशाल रागाने म्हणतो की माझं रिजन फालतू नव्हतं . यावर सोनाली विशालला स्पष्टीकरण देत म्हणते की, ‘तुला माणसांची किंमत नाहीये…तुझं स्टेटमेंट तुझी सिच्युएशन समोरच्या माणसांपेक्षा मोठी असते’ … यानंतर सोनाली भावुक होऊन रडू लागते. सोनाली आणि विशालमध्ये हा वाद नेमका कशामुळे झाला आहे याचा उलगडा झाला असला तरी दोघांतील मैत्रीचे संबंध आता तुटणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विशाल सोनालीची समजूत घालणार का की यांच्यातील झालेला वाद वेगळेच वळण घेणार हे येत्या काही दिवसातच समजेल. अर्थात बिग बॉसचे हे घर म्हणजे मनोरंजन असले आणि तो एक खेळ जरी असला तरी मैत्रीच्या नात्यात या खेळामुळे आडकाठी निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. तूर्तास त्यांच्यातील सुरुवातीपासूनची मैत्री पाहता वेळप्रसंगी हे दोघे एकमेकांना बिग बॉसच्या घरात राहून सपोर्ट करतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे. कारण बिग बॉसच्या घरात हे दोन्ही तगडे स्पर्धक असल्याचे म्हटले जात आहे. आजच्या भागानंतर बिग बॉसच्या चावडीची देखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. शनिवारच्या भागात महेश मांजरेकर कोणाला धारेवर धरणार आणि कोणाचे कौतुक करणार याचीच वाट प्रेक्षक पाहत आहेत. तूर्तास सोनाली आणि विशालमध्ये झालेला हा वाद लवकरात लवकर मिटावा आणि पुन्हा एकत्र यावेत अशीच अपेक्षा आहे.