अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फक्त मराठीच नाही तर अनेक हिंदी चित्रपटातही दिसली. एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने खूप नाव लौकिक मिळवलं. तिचे अनेक चित्रपट तिच्या अभिनयाने खुलून आले अनेक अवॉर्ड्सने तिला कित्तेकदा सन्मानित देखील करण्यात आलं आहे. बऱ्याच कमी लोकांना हे माहित असेल कि मराठी आणि हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिने इंग्लिश, तेलगू, बंगाली, तामिळ तसेच चक्क इटालियन चित्रपट देखील साकारले आहेत. ती अनेक सामाजिक संस्थांसाठी देखील काम करताना पाहायला मिळते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतच एका मुलाखतीत तिचा वर्ण भेदावरून हिणवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. ती सांगते कि पुण्यामध्ये ती गिरीश कर्नाड ह्यांना चेलुवी चित्रपटाच्या ऑडिशन साठी भेटायला गेली असताना चा प्रकार तिच्या सोबत घडला होता. ऑडिशन देण्याआधी मी बराच वेळ बाहेर बसून होते तेंव्हा तेथे उपस्तित असलेल्या मुलीच्या आईने माझ्या कडे पाहून मला उद्देशून “तू जरा आरश्यात तुझा चेहरा पहा, काळ्या मुली अभिनेत्री म्हणून चांगल्या दिसत नाहीत” असं म्हटलं होत. त्यावर मी काहीच बोलू शकले नाही. ऑडिशन ला जाण्याआधी तुम्हाला अश्याप्रकारे कोणी हिणवलं तर तुमचा कॉन्फिडन्स तेथेच निघून जातो माझ्या बाबतीत देखील अगदी तसाच घडलं. पण मला मुलाखतीसाठी गिरीश काकांनी आत बोलावलं आणि आपल्या मुलीप्रमाणे त्यांनी माझ्या सोबत चर्चा करत विचारपूस केली तेंव्हा झालेला प्रकार मी विसरून गेले. गिरीश काका खूप ग्रेट होते. त्यांना चित्रपटासाठी एक नवा चेहरा हवा होता. ऑडिशन साठी आलेली मुलगी काळी कि गोरी ह्यात त्यांना काडीमात्र इंटरेस्ट नव्हता.

आपलं बोलणं वागणं कस आहे हे त्यांच्यात हेरण्याची कला होती. तुम्ही कोण आहेत तुमचं बॅकग्राउंड काय आहेत तुम्ही काय वशिला लावता ह्यापेक्षा तुम्ही स्वतः काय आहेत ह्यात त्यांना जास्त इंटरेस्ट होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सारखं अनेक महिलांना अश्या समस्यांना नेहमी तोंड द्यावं लागत. पण अश्या व्यक्तींना तुम्ही इग्नोर करत जास्त महत्व दिल नाही तर ते तुमच्याच फायद्याचं असत. अश्या व्यक्तींना तोंड देत राहील तर त्यात आपलाच वेळ वाया जातो शिवाय आपण ज्या कामासाठी आलोय आपल्याला जे करायचंय ह्याच विसर पडतो जर ती ऑडिशन मी चांगली देऊ शकले नसते तर कदाचित मला अभिनेत्री म्हणून तुम्ही आज ओळखलं नसत. त्यामुळे तुम्हाला जे हवाय त्यात अडथळे आले तरी कुठं तोंड द्यायचं आणि त्यांना किती गृहीत धरायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे.