स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीची नव्याने एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्रीने मराठी सृष्टीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे तिच्या एन्ट्रीने मालिकेचा टीआरपी निश्चित वाढणार असे बोलले जात आहे. ज्योती ही अंजीची बहीण आहे आणि ती आता अंजिच्या संसारात ढवळाढवळ करण्यासाठी दाखल झाली आहे. ज्योतीने सुर्यासोबत लग्न केले मात्र एकत्र कुटुंब नको म्हणून तिने तिचा संसार मोडण्याचे ठरवले. ज्योतीची आई म्हणजेच आशा मामी यांनी आपल्या लेकीला हा सल्ला दिला होता.

मात्र तुला तुझा संसार समजत नाही का असे म्हणत आशामामीने देखील हात झटकलेले पाहायला मिळाले. इकडे अंजी आणि पश्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले असतानाच ज्योतीच्या एन्ट्रीमुळे आता त्यांच्या संसारात वादळ उठण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. या ज्योतीची भूमिका अभिनेत्री श्वेता मेहेंदळे हिने साकारली आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर अभिनेत्री श्वेता मेहेंदळे हिचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे. मात्र श्वेतामध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. अभिनेत्री श्वेता मेहेंदळे मालिकेत खूपच बारीक दिसत असल्याने तिच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. तू अगोदर होती तशीच खूप छान दिसत होतीस असे अनेक सल्ले आता तिला तिच्या चाहत्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. मालिकेतला ज्योतीच्या भूमिकेतला श्वेताचा लूक प्रेक्षकांच्यासमोर आला आहे. या लुकवरून तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर श्वेता मेहेंदळे रेणुका शहाणेच्या ‘त्रिभंग’ या नेटफ्लिक्सवरील सिरीजमध्ये झळकली होती. मालिका, चित्रपटामधून तिने अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत आता ती अंजीची बहीण म्हणजेच ज्योतीची भूमिका साकारत आहे. आशा मामीने तिचे राहतं घर पश्याच्या नावावर केल्यामुळे ज्योती आता कुठले पाऊल उचलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष्य लागून राहिले आहे. याआधी देखील श्वेताने अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका साकारल्या आहेत तिचं काम बहुल ती सर्वां आपलंस करून घेते. पण मधल्या बऱ्याच काळात ती आपल्याला भूमिका साकारताना पाहायला मिळाली नाही असो या नवीन भूमिकेसाठी अभिनेत्री श्वेता मेहेंदळे हीचं खूप खूप अभिनंदन..