ही पोली साजूक तुपातली …गे गाणं आहे टाईमपास या गाजलेल्या चित्रपटातलं. हे गाणं अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्यावर चित्रित झालं होतं. गाण्यामुळे लोकप्रियता मिळालेली शिबानी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. शिबानी दांडेकर ही मॉडेल, अभिनेत्री, गायिका तसेच सुत्रसंचालिका म्हणून ओळखली जाते. गेल्या काही महिन्यांपासून शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या लग्नाची चर्चा होत होती. आज १९ फेब्रुवारी २०२२ रोजी या दोघांचा मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला आहे. या लग्नाला हृतिक रोशनसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनि हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे.

फेब्रुवारी महिन्यात शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर लग्नबांधनात अडकरणार असल्याचे सांगितले जात होते. एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडणार अशी चर्चा होती मात्र पुण्यातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या खंडाळा येथील एका प्रशस्त फार्महाऊसमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. शिबानी आणि फरहान यांच्या लग्नसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या लग्नात ना हिंदू पद्धतीने फेरे घेतले नाहीत ना मुस्लिम पद्धतीने निकाह केला, केवळ विश्वासाच्या आणाभाका घेत त्यांनी हे लग्न केले असल्याचे समोर आले आहे. शिबानी दांडेकर हिचे कुटुंब मूळचे पुण्याचे मात्र कामानिमित्त ते परदेशात स्थायिक होते. बालपण परदेशात गेलेल्या शिबाणीने होस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. मायदेशी परतल्यावर अनेक प्रोजेक्ट्समधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. संघर्ष आणि टाईमपास या दोन मराठी चित्रपटात शिबाणीने आयटमसॉंग साकारले आहेत. त्यामुळे मराठमोळी मुलगी म्हणूनही तिला प्रसिद्धी मिळत गेली.

एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये शिबानी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाखल झाली होती त्यावेळी शिबाणीने’ मला मराठी चांगलं बोलता येत मला हिंदी येत नाही तुला मराठी येत नाही का?.. तू मुंबईत राहतोस आणि मराठी येत नाही…’ असे म्हणून कपिल शर्माला तीने ठणकावले होते. शिबाणीला दोन बहिणी आहेत अनुषा दांडेकर आणि अपेक्षा दांडेकर. अनुषा दांडेकर ही देखील हिंदी मराठी सृष्टीत झळकली आहे अभिनयासोबतच ती देखील उत्कृष्ट गायिका आहे. बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्ये करण कुन्द्रा सहभागी झाला होता तेजस्वी प्रकाश हिच्या अगोदर करण कुन्द्रा हा अनुषाला डेट करत होता. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पहिल्या लग्नापासून विभक्त झाल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला होता. आज त्यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडलेला पाहायला मिळतो आहे. यानिमित्ताने दोघांचेही खूप खूप अभिनंदन…