मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून लगीनघाई सुरू झालेली दिसली होती. गेल्या महिन्यात ३० एप्रिल रोजी रुचिताच्या घरी ग्रहमख पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर कडले होते. गेल्याच महिन्यात रुचिता जाधव हिला तिचा मित्र आणि बिजनेसमन आनंद माने यांनी प्रपोज केले होते. त्यानंतर तीने मीडियाशी बोलताना सांगितले होते की ३ मे रोजी आम्ही मोजक्या मित्रमंडळींसमवेत पाचगणी येथिल एका प्रायव्हेट फार्म हाऊसमध्ये लग्न करणार आहोत.

आणि आज ३ मे २०२१ रोजी हा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पाचगणी येथिल फार्म हाऊसवर पार पडला आहे. रुचिताने यावेळी लाल रंगाची नक्षीदार साडी परिधान केली होती. पाचगणी येथे निसर्गाच्या सानिध्यात तिचा हा लग्न सोहळा संपन्न झाला असून लग्नाला मोजक्याच मित्रमंडळींना तिने आमंत्रित केले होते. रुचिता ज्याच्याशी विवाहबद्ध झाली तो आनंद माने एक बिजनेसमन असून माने डेव्हलपर्सचा तो डायरेक्टर आहे. मराठी सृष्टीला लाभलेला ग्लॅमरस चेहरा म्हणून रुचिताला मराठी सृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली आहे. भरत जाधव सोबत काही चित्रपटात तिने कामही केले आहे. लव लग्न लोचा, मनातल्या उन्हात, माणूस एक माती, भुताचा हनिमून या चित्रपटातून रुचिताने अभिनय साकारला असून मालिका, चित्रपट असा प्रवास तिचा चालूच आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाची नुकतीच दखल घेण्यात आली असून काही दिवसांपूर्वी पूर्व युरोप आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने तिला गौरविण्यात आले हया चित्रपटातील तिच्या अभिनयाला ‘गोल्ड अवॉर्ड बेस्ट ऍक्टरेस’ या पुरस्काराने तिला नावाजले गेले आहे.

रुचिता आणि आनंद यांचा १ मे रोजी मेहंदी सोहळा पार पडला होता तर २ तारखेला हळद आणि संगीत सोहळा पाचगणी येथेच पार पडला. रुचिता आणि आनंद यांची ओळख गेल्या वर्षी झाली होती. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते आणि मागच्याच महिन्यातील ९ एप्रिल रोजी आनंदने तिला प्रपोज देखील केले होते आज पार पडलेल्या या लग्न सोहळ्याला मोजक्याच मित्रमंडळींना तीने आमंत्रित केले आहे मात्र लग्नानंतर एक मोठी पार्टी आयोजित करण्यात येईल ज्यात मराठी इंडस्ट्रीतील माझ्या सहकलाकार आणि मित्रांना आमंत्रित करण्यात येईल असेही तिने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. अभिनेत्री रुचिता जाधव या पुढेही मराठी मालिका आणि चित्रपटात पहिल्या सारखंच काम करताना नक्कीच पाहायला मिळेल असं हि तिने ह्यावेळी सांगितलेलं पाहायला मिळालं. अभिनेत्री रुचिता जाधव आणि आनंद यांना वैवाहिक जीवनाच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…