संकट काळात गरजू व्यक्तींना मदत करणारे बरेचसे कलाकार आपल्या चाहत्यांना मदतीचे आवाहन सोशल मीडियावरून करताना दिसतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेची होस्ट आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील असेच एक आवाहन आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरून केलेले पाहायला मिळत आहे. प्राजक्ता माळीने ठाण्यात कार्यरत असलेल्या “आपलं घर” या संस्थेला खारीचा वाटा म्हणून मदत करण्याचे जाहीर केले आहे आणि तशा स्वरूपाची तिने आजवर मदतही पुरवली आहे. “आपलं घर” ही एक सामाजिक संस्था ठाण्यात गेल्या १९९६ सालापासून कार्यरत आहे. आगथा सुशीला दियास यांनी ही संस्था सुरू केली असून १०९ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली आहे.

या संस्थेमार्फत गरजू व्यक्तींना, मुलांना आणि वृद्धांना मदत म्हणून अन्न धान्य, शैक्षणिक सुविधा तसेच गरजेच्या वस्तू पुरवण्याचे कार्य करत आहे. त्यांचे कार्य तुम्हाला त्यांच्या पेजवरच जाऊन पाहता येईल. ठाण्यातील स्थानिक लोकांना या संस्थेने गरजेच्या काळात अन्नधान्याचे वाटप केले होते. तर त्यांच्याच शैक्षणिक संस्थेद्वारे आजवर कित्येक मुलिंच्या शिक्षणाची जबादारी त्यांनी पेलली आहे. मात्र आज ही संस्था एका मोठ्या अडचणीत सापडली आहे आणि तिला तुमच्या मदतीची गरज आहे असे आवाहन प्रजक्ताने आपल्या इंस्टाग्रामवरून केले आहे. “आमचं घर ” ही एनजीओ संस्था असून तिला सध्या तुमच्या मदतीची गरज आहे. या सामाजिक संस्थेचे मदतीचे हे कार्य अखंडपणे चालू राहावे यासाठी तुमची मदत या संस्थेसाठी लाख मोलाची ठरणार आहे . सध्या को’रो’ ना काळामुळे ही संस्था आर्थिक दृष्ट्या हतबल झालेली असली तरी अजूनही तिने गरजूना मदत करण्याची उमेद सोडलेली नाही. प्राजक्ता माळीने देखील तिच्या परीने होईल तशी छोटीशी मदत या संस्थेला केली आहे. तिच्या या आवाहनाला सह कलाकार आणि चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हीही या संस्थेला हवी तशी मदत करू असे आश्वासन दिले आहे सर्व डिटेल्स तिने तिच्या इंस्टाग्रामवरून दिले आहेत.