
कलाकारांना चाहत्यांच्या संपर्कात राहता यावे म्हणून सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. अर्थात काम मिळवण्यासाठी देखील हे एक प्रभावी माध्यम ठरलेलं आहे. त्यामुळे आयुष्यात घडत असलेल्या नवनवीन गोष्टी ही कलाकार मंडळी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात किंवा फोटोशूट करून लक्ष वेधून घेतात. पण एक काळ प्रसिद्धीच्या झोतात असलेली ही मराठी अभिनेत्री मात्र या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. ही अभिनेत्री आहे पल्लवी सुभाष म्हणजेच पल्लवी शिर्के. अभिनेत्री पल्लवी शिर्के चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवनवीन फोटो शेअर करत असते. पण तिच्या या फोटोमध्ये बरीचशी विसंगती तुम्हाला पाहायला मिळेल.

या फोटोत पल्लवीचा चेहरा फक्त ओरिजनल वाटतो मात्र तिच्या आसपास असलेल्या गोष्टी अनैसर्गिक जाणवतात. त्यामुळे पल्लवी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तिच्या बऱ्याच फोटोंच्या खाली कमेंटबॉक्समध्ये ट्रोलर्सने तिला खराब एडिटिंगसाठी सुनावले आहे. काहींनी तर ‘बेक्कार एडिटिंग’ म्हणत तिला नावं ठेवली आहेत. हिला काम मिळत नाही म्हणून असं करते असेही तिच्याबद्दल बोललं जात आहे. कारण बरेच दिवस पल्लवी शिर्के अभिनय क्षेत्रापासून दूर असलेली पाहायला मिळत आहे. चार दिवस सासूचे, अशोक सम्राट, करम अपना अपना, पोलिसाची बायको अशा हिंदी मराठीतून अभिनय साकारला आहे. पण गेल्या काही वर्षात पल्लवीने फक्त जाहिरातीतच काम करणे पसंत केले.
