निर्माता विवेक अग्निहोत्री यांना गेल्या काही महिन्यांपासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे नुकतेच त्यांनी ट्विटर अकाउंट बंद ठेवले आहे. मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री पल्लवी जोशी ही त्यांची पत्नी आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग अमेरिकेत पार पडले होते. हा चित्रपट कश्मिरमध्ये पंडितांवर झालेल्या हल्ल्यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहून एका ठराविक समुदायाने विवेक अग्निहोत्री यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी या धमक्यांना दुर्लक्षित केले मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून त्यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या देणारे फोन कॉल्स येऊ लागले आहेत.

द कश्मीर फाईल्स हा चित्रपट येत्या ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दीप्ती नवल सारखे कसलेले कलाकार झळकणार आहेत. मात्र या चित्रपटामुळे विवेक अग्निहोत्री यांना त्यांचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी बंद म्हणजेच डीऍक्टइव्हेंट करावे लागले आहे. याबाबत विवेक अग्निहोत्री यांनी इन्स्टग्रामवर पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात की, ट्विटर ने माझे अकाउंट सस्पेंड केले नाही तर मीच ते डिअक्टीव्हेट केलं आहे. जेव्हापासून माझ्या आगामी चित्रपटाबद्दल मी जाहीर केले तेव्हा ट्विटरने माझ्यावर निर्बंध लादले. माझ्या फॉलोअर्सची संख्या कमी होऊ लागली आहे अनेकांना माझ्या पोस्ट दिसणे बंद झाले आहे. एवढेच नाही तर माझी वॉल धमक्या आणि अश्लील संदेशांनी भरली आहे. मी ह्या तत्वांना पेलू शकत नाही असे नाही. पण जेव्हा तुमच्या कुटुंबाला धमक्या आणि मानसिक त्रास दिला जातोय हे नेमके कशासाठी? प्रामाणिकपणे मी कशीरमधील माझ्या बंधू भगिनींवर झालेल्या अत्याचारावर चित्रपट बनवला म्हणून? सत्य काय आहे हे बाहेर येईल म्हणून?…’

विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती . त्यात त्यांनी म्हटले होते की, प्रेक्षकांकडून आपण काही अपेक्षा नाही ठेऊ शकत जर तुम्ही तुमचा चित्रपट प्रामाणिकपणे बनवला असेल त्यातील शब्द न शब्द खरा असेल तर …चित्रपट पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की सांप्रदायिक मुद्द्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे की सामुदायिक आणि कट्टरवादीवर आक्षेप घेणारी आहे. परंतु चित्रपट पाहिल्यावर अवघ्या ५ मिनिटांनीच तुम्हाला याचा उलगडा होईल की असे यात काहीही नाही. हा चित्रपट फक्त कश्मीरी पंडितांवर भाष्य करणारा नसून तो तमाम भारतीयांना उद्देशून बनवला आहे. त्यांनी सोशिअल मीडियापासून दूर राहून घेतलेला हा निर्णय काही काळासाठी तरी योग्य असल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे.