बहुतेक कलाकार मंडळी ही आपल्या बाळाच्या बाबतीत नेहमीच सिक्युअर राहिलेले पाहायला मिळतात . बॉलिवूड सृष्टीत या गोष्टी सर्रास पाहायला मिळत असल्याने काही मराठी सेलिब्रिटी देखील या गोष्टीचे अनुकरण करताना दिसतात. करीना कपूर, अक्षय कुमार असो वा अनुष्का शर्मासारखे मोठमोठे सेलिब्रिटी आपल्या मुलांचे फोटो लिक होऊन नयेत म्हणून काळजी घेताना पाहायला मिळाले मात्र त्यांच्या चाहत्यांची देखील उत्सुकता आणि ईच्छा असते की आपल्या आवडत्या सेलिबिटींची मुलं नेमकी कशी दिसत असतील. मराथी चित्रपट अभिनेत्री क्रांती रेडकरने देखील आपल्या जुळ्या मुलींना कधीच सोशल मीडियावर प्रसिद्ध केले नाही.

त्यांचं आयुष्य त्यांना मनसोक्त जगायला हवे , त्यांना जेव्हा मिडियासमोर यावे असे वाटेल तेव्हा त्या येतील. असे क्रांती रेडकरचे यामागचे म्हणणे आहे. २४ मार्च रोजी मराठी मालिका अभिनेत्री मृणाल दुसानिसला कन्यारत्न प्राप्ती झाली. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर मृणालने तिच्या मुलीचा नीरजसोबत खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ‘आणि नीरज बोलता झाला…’ असे म्हणत तिने प्रथमच तिच्या नवऱ्याला इतकं बोलताना पाहिलं होतं. मुलीच्या जन्मानंतर एका बापामध्ये झालेला हा बदल मृणालने तिच्या कॅमेऱ्यात कैद केला होता. नुकतेच मृणालने आपल्या लेकीचा म्हणजेच ‘नूरवी’ चा एक सुंदरसा फोटो शेअर केला आहे. तिच्या मुलीचा क्युट फोटो पाहून तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. मृणालचा सोशल मीडियावर खूप चांगला फॅनफॉलोअर्स आहे त्यामुळे तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी छानशा प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. खूप छान छान कमेंट्स मृणालने शेअर केलेल्या फोटोवर पाहायला देखील मिळतील.

मराठी सृष्टीतील सोज्वळ आणि तितकीच सालस अभिनेत्री म्हणून मृणालला लोकप्रियता मिळाली आहे. कुठल्याही प्रकारे अंगप्रदर्शन न करता केवळ आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. त्यामुळे मराठी सृष्टीत तिला वेगळी ओळख मिळाली आहे. हे मन बावरे या मालिकेच्या एक्झिट नंतर मृणालने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत नवऱ्यासोबत परदेशात राहणे पसंत केले आहे. घर संसार आणि मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळत ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांशी कनेक्टेड राहिलेली पाहायला मिळते आहे. सध्या अभिनेत्री मृणाल दुसानिस हि मातृत्वाचे सुख अनुभवत आहे तिच्या या प्रवासासाठी आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा!.