मुंबईसारख्या ठिकाणी स्ट्रगल करून घर खरेदी करणे गाडी खरेदी करणे या गोष्टी आता मराठी कलाकारांसाठी सोपस्कार होऊ लागल्या आहेत. असाच काहीसा अनुभव मराठी मालिका अभिनेत्री मीनल बाळ हिने देखील घेतला आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्वागत करत आता इथून पुढचा प्रवास तुझ्याबरोबर असे म्हणत मीनल बाळ हिने गाडी खरेदी केल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिनलने Nexa ब्रँडची Ciaz गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत साधारण ८.५० ते ११ लाख एवढी किंमत आहे.

गाडी खरेदी करण्याचा आनंद तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून मीनल बाळ प्रकाशझोतात आली होती. या मालिकेत तिने लाडीची भूमिका साकारली होती. या भूमिकेने मिनलला अमाप प्रसिद्धी मिळाली होती.लग्नाची बेडी, जाऊ नको दूर बाबा, तारक मेहता का उलटा चष्मा अशा मालिकांमधून मीनल महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. रानजाई या आगामी चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मीनल गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिका सृष्टीत स्थिरस्थावर झालेली पाहायला मिळत आहे. मात्र या प्रवासात आपल्याला काम मिळावे यासाठी काय काय करावे लागते यासंदर्भात नुकतीच एक पोस्ट तिने सोशल मीडियावर लिहिली होती. अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी कसं गोड गोड वागावं लागतं, प्रोजेक्ट शी संबंधित असलेल्यांची छान छान वागावं लागतं तेव्हा जाऊन कुठे सिनेमा मालिका किंवा वेबसीरीज मध्ये वर्णी लागते. प्रामाणिकपणे खूप मनापासून सिरीयसली काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड,संयम,श्रध्दा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूट है.

कोणाच्या तरी मागे मागे करा, करेक्ट लोकांच्या संपर्कात रहा,एखाद्या ग्रूपशी संलग्न रहा, दाखवण्या पुरते खूप गोड वागा आणि बास …झालं काम. मग काय कामा वर काम मिळत राहणार आणि मग वर वर काम केलं तरीही किंवा काम येत नसेल तरीही फरक पडणार नाही . तुमच्या डोक्यावर क्राऊन हा असणारच आणि मग त्याचाच रुबाब (attitude) करायचा. आहे की नाही वर जाण्याचा म्हणजे प्रसिद्ध होण्याचा मार्ग.शू…..कोणाला सांगू नका हा , हा मार्ग मी तुम्हाला सांगितला ते… आपलं सिक्रेट’ असं म्हणत मीनलने मनोरंजन क्षेत्रासह प्रेक्षकांनाही धक्का दिला होता.