चित्रपटात, नाटकात अनेकदा प्रभावी भूमिका असल्या की प्रेक्षक आपोआप त्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारासमोर नतमस्तक होऊन जातात. मग छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकाराने साकारलेली हरएक भूमिका असो वा अभिनेते मोहन जोशी यांनी साकारलेले देऊळबंद चित्रपटातील स्वामी समर्थ अथवा रामायण, श्रीकृष्ण या गाजलेल्या हिंदी मालिकेतील कलाकार असो अशा प्रभावी भूमिका वठवणाऱ्या कलाकारांसमोर प्रेक्षक नेहमीच नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सेटवर येतात. असाच एक अनुभव नाशिकच्या अभिनेत्रीलाही आला आहे.

नाशिक ची ही अभिनेत्री आहे फॉरेस्ट ऑफिसर “माधवी जाधव” . तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत नाना देशमुख यांनी भूमिका साकारणारे अभिनेते ‘निवास मोरे’ यांनी माधवी जाधवच्या जीवनप्रवासाचा आढावा घेऊन एक छानशी पोस्ट लिहिली आहे. निवास मोरे हे बीजनेसमन , दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून ओळखले जातात. काही मराठी मालिका, नाटक त्यांनी अभिनित केले आहेत. आपल्या पोस्टमधून ते अभिनेत्री माधवी जाधव यांचे कौतुक करताना म्हणतात की, ” नाशिकच्या नाट्य सिनेमा, शॉर्ट फिल्म मध्ये तिने अभिनयनाने स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. त्याच बरोबर राज्य नाट्य स्पर्धा, शॉर्ट फिल्म. ती स्वता उत्तम दिगदर्शिका, लेखिका , कवियत्री असून लवकरच तिचा कविता संग्रह प्रसिद्ध होत आहे, या मध्ये उच्च महिला ते सोशिक महिला यांचे भावविश्व दाखवले आहे. हा कविता संग्रह वाचताना नक्कीच डोळे पाणावतात. गाढवाच्या लग्नातील गंगी असो वा, राजमाता अहिल्या देवी वरील अहिल्या या नाटकाचे लेखन व सादरीकरण पूर्ण महाराष्ट्र मध्ये ती करत असते.

तिची अहिल्या देवी महाराष्ट्र मध्ये लोक अक्षरशः डोक्यावर घेतात . प्रयोग संपल्यावर भाबडे प्रेक्षक अक्षरशः तिच्या पाया पडतात. हीच तिच्या कामाची पावती आहे . इंटरनॅशनल विजेती फिल्म कावळा मधील तिची लक्ष्मी भाव खाऊन गेली, गडद जांभूळ मधील आदिवासी महिला लक्षात राहते, हे सर्व करत असताना तिने तिच्या घराकडे बिलकुल दुर्लक्ष केले नाही , नौकरी सांभाळून अभिनयाचे लेखनाचे वेड तिने जपले आहे. संसाराचा वेलीवर दोन सुदंर फुल बहरली आहे. या प्रवासात तिचे पती संजय यांची मोलाची साथ लाभते म्हणून मी हे सर्व करू शकते हे ती प्रामाणिक पणे कबूल करते, तिची फॉरेष्ट ची नौकरी सांभाळून तिच्या कडून खुप छान छान कविता व चांगल्या उत्तम भूमिका बघावयास मिळो ही रसिक प्रेक्षकांची अपेक्षा, शुभेच्छा माधवी तुझ्या सुदंर प्रवासाला” .