अभिनेत्री क्रांती रेडकर हीचा पती समीर वानखेडे सध्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन ह्याची केस हाताळतो आहे. समीर एक कर्तव्यदक्ष अधिकारी असूनही त्याच्यावर आणि त्याच्या परिवारावर चिखलफेक झालेली पाहायला मिळतेय. मलिक ह्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या परिवारावर नको नको ते आरोप केलेले पाहायला मिळाले. “समीर वानखेडेचा बाप बोगस आहे, त्याच्या घरातील सगळेच बोगस आहेत वर्षभरात त्याची नोकरी जाईल आणि तो तुरुंगात जाईल.” असे एक ना अनेक वक्तवे नवाब मलिकांनी केली होती. इतकंच नाही तर समीर वानखेडे ह्यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो देखील त्यांनी शेअर केला होता.

यावर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले “मी सांगू इच्छितो कि माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी उत्पादन शुल्क पुणे येथील विभागात पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम आहे. माझ्या आईच नाव स्वर्गीय श्रीमती झहीदा ह्या मुस्लिम होत्या. मी भारतातील संमिश्र बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबात जन्माला आलो आणि मला त्याचा अभिमान आहे. अभिनेत्री आणि समीर वानखेडे यांची पत्नी असलेल्या क्रांती रेडकर ह्यांनी ह्या पूर्वी देखील ह्यावर खुलासा केला होता आणि आता देखील त्यांनी प्रेस कॉन्फेरंच घेत ह्या गोष्टीवर उलगडा करत नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. प्रेस कॉन्फेरंस मध्ये त्या म्हणाल्या” माझा पती कोण आहे? त्याची जात कोणती? त्यांनी किती लग्न केली? ह्याचा आर्यनच्या केसही काय संबंध आहे. नवाब मलिक मीडियाची दिशाभूल करत आहेत. तुम्ही कॉमन पब्लिकला त्रास देता. हि काय वागण्याची रीत आहे. मीडियाला इतकंच वाटत असेल तर नवाब मलिक यांचे जावई समीर खान कोण आहेत ते मीडियाने पाहावं. आपलं झाकून ठेवण्यासाठी ते आमच्यावर चिखलफेक करत आहेत. आम्ही ह्या प्रकरणामुळे खूप त्रासले आहोत आतातरी तुम्ही जागे व्हा.” अश्या शब्दांत अभिनेत्री क्रांती रेडकर ह्यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

तर इकडे शाहरुखचा मुलगा बाहेर पडणार तेंव्हापासून फटाके फुटायला सुरवात झालेली पाहायला मिळतेय. सोशिअल मीडियावर देखील आर्यन ने असे काय केले आहे ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्यासाठी फटाके वाजवून त्याच स्वागत केल्याने लोक नाराजी दर्शविताना पाहायला मिळत आहेत. क्रांती रेडकर ह्या मीडियाशी बोलताना पुन्हा एकदा म्हणाल्या कि नवाब मलिक मोठे नेते आहेत म्हणून त्यांनी आमच्यावर वाट्टेल ते आरोप करणे योग्य नाही. आम्ही त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई देखील करणार आहोत. मीडिया एकच बाजू मांडताना पाहायला मिळते पण मलिक यांचा जावई समीर खान कोण आहे हे एकदा तपासून पहा तुम्हाला सर्व गोष्टींचा उलगडा होईल असं तिने म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखीन वेगळ वळण घेणार हे नक्की. आता नवाब मलिक ह्यावर काय बोलणार आहेत हे हि पाहायला लोक आतुर आहेत.