जरा हटके

मराठी अभिनेत्री कविता मेढेकर यांनी प्रथमच शेअर केला मुलीसोबतचा फोटो दिसते खूपच सुंदर

अभिनेत्री कविता मेढेकर या मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कविता मेढेकर या पूर्वाश्रमीच्या “कविता लाड” . लहानपणी कुठल्याही नाटकात, एकांकिकेत न झळकलेल्या कविता लाड यांनी पेपरमधली जाहिरात वाचून “पैलतीर” या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली होती. पुढे ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना डॉ गिरीश ओक एक एकांकिका बसवत होते.

actress kavita lad medhekar husband
actress kavita lad medhekar husband

कलाकारांची निवडही त्यांनीच केली होती. परंतु त्यातील एक मुलगी आणि एका मुलाचा वाद झाला. या वादामुळे त्या मुलीला गिरीश ओक यांनी तडकाफडकी काढून टाकले आणि दारात उभ्या असलेल्या कविता लाड यांना ‘तू या एकांकिकेत काम करणार’ असे सांगितले. कविता लाड यांना अभिनयाचा कुठलाही अनुभव नसताना डॉ गिरीश ओक यांनी अगोदर एकांकिका वाचायला सांगितली. आणि कविता लाड यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. डॉ ओक यांनी कविताचे नाव सुचवल्यामुळेच “घायाळ” या पहिल्या वहिल्या चित्रपटात झळकण्याची संधी त्यांना मिळाली होती. “सुंदर मी होणार” या नाटकाचे काहीच प्रयोग करण्यात येणार होते मात्र नाट्यनिर्माते सुधीर भट यांनी हे नाटक पाहिलं आणि कविताचे काम पाहून हे नाटक पुढे व्यावसायिक नाटक बनवायचं त्यांनी ठरवलं. चार दिवस सासूचे, उंच माझा झोका, राधा ही बावरी, राधा प्रेम रंगी रंगली, एका लग्नाची गोष्ट, लपून छपून, उर्फी, एका लग्नाची पुढची गोष्ट या आणि अशा कित्येक मालिका, चित्रपट आणि नाटकांतून त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. मेजवानी परिपुर्ण किचन, जोडी जमली रे या शोचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.

actress kavita lad medhekar daughter
actress kavita lad medhekar daughter

२००३ साली अभिनेत्री कविता लाड या आशिष मेढेकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. ईशान आणि सनाया ही त्यांची दोन मुलं आहेत. कविता लाड मेढेकर यांचे पती आशिष मेढेकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबईतील Triton communications मध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत. कविता लाड मेढेकर यांना नाटकाच्या, शूटिंगच्या दौऱ्यामुळे कित्येकदा घराबाहेर राहावे लागते यादरम्यान आशिष मेढेकर यांची वेळोवेळी खंबीर साथ त्यांना मिळते हे विशेष. शिवाय मुलं देखील मोठी झाली आहेत आणि तितक्याच जबाबदारीने वागत असल्याने दौऱ्यादरम्यान घरची कुठलीही काळजी करावी लागत नाही असे कविता मेढेकर आपल्या कुटुंबाबाबत सांगतात. नुकतेच त्यांनी गौरी गणपतीचे औचित्य साधून आपली लेक सनाया सोबतचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केला. “माझी गौरी” असे कॅप्शन देऊन त्यांनी हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोवरून कविता मेढेकर आणि त्यांची लेक सनाया यांचे सेलिब्रिटींकडून कौतुक होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button