ब्योमकेश बक्शी हि मालिका दूरदर्शन वाहिनीवर १९९३ साली प्रदर्शित करण्यात आली होती. ह्या मालिकेचे एकूण ३२ भाग दाखवण्यात आले होते. सत्य कि खोज करणेवाला “सत्यान्वेशी” म्हणून त्यांची प्रचिती होती. महान साहित्यिक जासूस ‘शरलोक होम्स’ याची प्रेरणा घेत ब्योमकेश बक्शी हि मालिका सुरु झाली. अल्पावधीतच ह्या मालिकेने प्रेक्षकाना आपल्याकडे ओढून घेतलं. आज देखील सोशिअल मीडियावर या मालिकेचे अनेक भाग पाहिले जातात. अनेक मराठी कलाकारांनी ह्या मालिकेत विविध भूमिका साकारल्या आहेत. आज देखील त्या अभिनेत्री मराठी तसेच हिंदी मालिकांत काम करताना पाहायला मिळतात. चला तर जाणून घेऊयात ह्या अभिनेत्री आहे तरी कोण ज्यांनी ह्या मालिकेत कामे केली होती.

ब्योमकेश बक्शी मालिकेत ब्योमकेश बक्शी यांच्या पत्नीची म्हणजेच सत्यवती ची भूमिका अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने हिने साकारली होती. सुकन्या कुलकर्णी यांचा जन्म मुंबई येथे झाला, मुंबई येथेच त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. शाळेत असल्यापासूनच त्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असत. कॉलेज जीवनापासूनच त्यांनी नाटकांत कामे केली. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना अनेक मालिका तसेच चित्रपटांत काम करायची संधी मिळाली. आभाळमाया, कळत नकळत, शांती, चूक भूल द्यावी घ्यावी, जुळून येती रेशीमगाठी, घाडगे अँड सून अश्या अनेक मालिकांतून त्या पाहायला मिळाल्या. अभिनेते संजय मोने यांच्याशी त्यांनी विवाह केला.

ब्योमकेश बक्शी मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर ह्या देखील पाहायला मिळाल्या होत्या. त्यांची दामिनी हि मालिका दूरदर्शनवर खूपच गाजली होती. मराठीच नाही तर हिंदी मालिकांत देखील त्यांनी आपला ठसा उमठवला. सख्खा भाऊ पक्का वैरी, सरकारनामा, ही पोरगी कोणाची, मोकळा श्वास अश्या अनेक चित्रपटांत त्यांनी कामे केली. बिनधास्त हा त्यांचा चित्रपट त्यावेळी खूपच गाजला होता. अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका केल्या आणि एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवले. प्रशांत दळवी हे त्यांचे पती. त्यांना रुंजी नावाची कन्या आहे.

ब्योमकेश बक्शी मालिकेत आणखीन एक अभिनेत्री झळकलेली होती त्या म्हणजे सुचित्रा बांदेकर. अनेकांना हे माहित नसेल कि सुचित्रा बांदेकर यांचे लग्नापूर्वीचे नाव सुचित्रा गुडेकर होते. त्यांचे शालेय शिक्षण “बाल मोहन विद्या मंदिर”, मुंबई येथे झाले. मुंबईतल्या रूपारेल महाविद्यालयातून त्या बी.ए. झाल्या कॉलेज मध्ये असल्यापासून त्यांचं अभिनेते आदेश बांदेकर यांच्यावर प्रेम होत पुढे जाऊन त्यांनी त्यांच्यासोबत विवाह देखील केला. फुल ३ धमाल, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सिंघम यांसारख्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. हम पाँच, आभास हा, खामोशियाँ यांसारख्या मालिकात देखील त्यांनी कामे केली.

ब्योमकेश बक्शी मालिकेत झळकलेले ४ थी दिग्गज मराठी अभिनेत्री म्हणजे शिल्पा तुळसकर. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल कि वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी शिल्पा तुळसकर हिने प्रसिद्ध हिंदी मालिका ब्योमकेश बक्शी (जासूस -सत्यन्वेषी) यामध्ये देखील काम केलं होत. ब्योमकेश बक्शी मधील किले का रहस्य ह्या भागामध्ये शिल्पा हिने तुलसी साकारली होती. शिल्पाने साकारलेली तुलसी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. ह्या हिंदी मालिकेतूनच त्यांनी हिंदी मालिकांत आपलं पहिलं पाऊल टाकलं. शांती, दिल मिल गये, कैसा ये प्यार है, देवो के देव महादेव अशा अनेक हिंदी मालिकेतून शिल्पा तुळसकर महत्वाच्या भूमिकेत झळकल्या आहेत. हद कर दी या मालिकेत शिल्पाने नम्रता सिंग धनवा ही व्यक्तिरेखा साकारली होती. याच मालिकेत स्वप्नील जोशीने शिल्पाच्या मुलाची भूमिका बजावली होती. तू तेव्हा तशी या झी वाहिनीच्या मालिकेत त्या सध्या झळकत आहेत.