या ६ मराठी अभिनेत्रींनी जोडीदार म्हणून निवडले अ मराठी कलाकार… बॉलिवूड टॉलीवुड सृष्टीतील आहेत दिग्ग्ज कलाकार

मराठी अभिनेत्री आणि त्यांचे जोडीदार हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. बहुतेक कलाकार मंडळी ही आपल्या जोडीदाराची निवड करत असताना याच क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना प्राधान्य देतात. एकाच क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यातील अडचणी समजून घेता येतात त्यामुळे कुठलेही वादविवाद होण्याचे टाळले जाते. मराठी नायिकांनी आपल्या जोडीदाराची निवड करत असताना बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सृष्टीलाही प्राधान्य दिलेले आहे. त्यातील काही निवडक कलाकारांची यादी पाहुयात. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने बॉलिवूड हिंदी मालिका अभिनेता हिमांशू मल्होत्रा सोबत लग्नाची गाठ बांधलेली पाहायला मिळते. २०१५ साली या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलेलं पाहायला मिळालं. एका मित्राच्या ओळखीने या दोघांची भेट घडून असली होती. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटत होता. त्यामुळे त्यांच्या अनेक वर्षांच्या मैत्रीचे रूपांतर लग्नात झाले. हे दोघेही बऱ्याचदा वेगवेगळे राहताना दिसतात. करिअरच्या दृष्टीने अमृताला एक वेगळी स्पेस हवी होती म्हणून त्या दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे मात्र त्यांच्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललेले पाहायला मिळते. दोघेही जेव्हा कधी एकत्र भेटतात तेव्हा ते व्हीडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात.

रेणुका शहाणे यांनी पहिल्या लग्नातून विभक्त झाल्या नंतर बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा सोबत प्रेमविवाह केला. रेणुका शहाणे यांनी विजय केंकरे यांच्याशी पहिले लग्न केले होते. मात्र त्यांना घटस्फोट दिल्यानंतर त्या एकाकी राहू लागल्या. अशातच आशुतोष राणा यांनी एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी रेणुका शहाणे यांना फोनवरून रोमँटिक कविता ऐकवली. तेव्हा ही कविता ऐकल्यानंतर रेणुकाजी भावुक झाल्या आणि राणाजींना आय लव्ह यु म्हणाल्या. रेणुका शहाणे सध्या मराठी सृष्टीत जास्त वावरताना दिसत आहेत. स्मिता पाटील या मराठी चित्रपट तसे हिंदी चित्रपटातून एक यशस्वी नायिका म्हणून प्रसिद्धी मिळवू लागल्या. अशातच चित्रपटात एकत्रित काम करत असताना राज बब्बर यांच्या त्या प्रेमात पडल्या. राज बब्बर हे अगोदरच विवाहित होते मात्र तरीही दोघांनी १९८६ साली लग्नाची गाठ बांधली होती. त्यामुळे हे लग्न खूप चर्चेत राहिले होते. मुलगा प्रतिकच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसातच स्मिता पाटील यांचे निधन झाले होते. त्यावेळी मराठी हिंदी सृष्टीने हळहळ व्यक्त केली होती. नम्रता शिरोडकर हिने हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख बनवली होती. यादरम्यान दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता महेश बाबू याची ती क्रश बनली. २००० साली या दोघांनी एकत्रित एक दाक्षिणात्य चित्रपट केला होता. दोघेही एकमेकांना आवडू लागले आणि त्यामुळे महेश बाबूने नम्रताला प्रपोज केले आणि २००५ साली त्यांनी लग्नगाठ सुद्धा बांधली.

बिनधास्त या एकमेव मराठी चित्रपटामुळे गौतमी गाडगीळ हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. त्यानंतर तिने आपली पाऊलं हिंदी मालिकेकडे वळवली. इथेच हिंदी चित्रपट मालिका अभिनेता राम कपूरशी तिची ओळख झाली..या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि पुढे लग्नात झाले. २००३ साली या दोघांनी मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली होती. तन्वी पालव ही मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहे. शुभं करोती, रंग माझा वेगळा, जावई विकत घेणे आहे अशा मालिकांमधून तन्वी प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. अभिनयाच्या जोडीलाच तन्वी शास्त्रीय नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्धी मिळवत होती. २०२० मध्ये मल्याळम अभिनेता आणि गायक असलेल्या सिद्धार्थ मेनन याच्याशी त्याने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तन्वी कीर्तन नाद या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसली होती. टाईमपास चित्रपटातील ही पोली साजूक तुपातली या एका गाण्यामुळे मराठमोळी अभिनेत्री शिबानी दांडेकर प्रकाशझोतात आली होती. यानंतर शिबानी अनेक हिंदी कार्यक्रमात होस्ट, अभिनेत्री म्हणून परिचयाची बनली. रिऍलिटी शोमध्ये शिबानी स्पर्धक बनून गेली असतानाच ती बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या प्रेमात पडली. हे दोघे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले आणि २०२२ साली त्यांनी मोठया थाटात लग्न केले.