महाराष्ट्राची क्रश असलेली हृता दुर्गुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मन उडू उडू झालं, फुलपाखरू , दुर्वा अशा केवळ बोटावर मोजण्या इतक्याच मालिका आणि नाटकातून काम करून हृताने आपल्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. एक्सप्रेशन क्वीन अशीही तिची ओळख आहे. हृताचा इन्स्टाग्रामवर दोन मिलियन हुन अधिक फॅनफॉलोअर्स आहे मराठी सृष्टीतील सर्वात जास्त फॅनफॉलोअर्स असणारी ती पहिली अभिनेत्री ठरली आहे आणि म्हणूनच हृता महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते. काहीच महिन्यांपूर्वी तिने हिंदी मालिका दिग्दर्शक असलेल्या प्रतीक शाह सोबत साखरपुडा केला होता त्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला आणि प्रतिकला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या.

आता ती लग्न कधी करणार याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. हृता आणि प्रतीक दोघेही पुढच्याच महिन्यात लग्नबांधनात अडकणार असल्याची बातमी जोरदार व्हायरल होत आहे. मे महिन्यात मोठ्या थाटात या दोघांचा लग्नसोहळा सजलेला पाहायला मिळणार आहे. हृता सोबत मराठी सृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री मे महिन्यातच लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवानी रांगोळे आणि मृणाल कुलकर्णी यांचा लाडका लेक विराजस मे महिन्यातच विवाहबद्ध होत आहेत. ७ मे २०२२ ही लग्नाची तारीख त्यांनी नुकतीच जाहीर केली आहे. विराजस आणि शिवाणीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शनिवारी ७ मे रोजी संध्याकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अतिशय गुप्तता बाळगून विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांची एंगेजमेंट सेरेमनी पार पडली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी या सोहळ्याला आमंत्रित केले होते. त्यामुळे आता दोघांचा लग्न सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार असे त्यांनी जाहीर केले आहे.

त्यामुळे आतापासूनच या दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. विराजस आणि शिवानी रांगोळे या दोघांनी नाटकातून एकत्रित काम केले आहे. थिएटरऑन या नाट्यसंस्थेशी हे दोघेही जोडले गेले आहेत. इथूनच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. विराजसने झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. अभिनेता, नाट्यलेखक, नाट्य दिग्दर्शक, चित्रपट सहदिग्दर्शक अशी ओळख मिळालेला विराजस व्हीक्टोरिया या आगामी चित्रपटातून प्रथमच दिग्दर्शन करणार आहे. तर शिवानीने देखील सांग तू आहेस का, आम्ही दोघी, आप्पा आणि बाप्पा, डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिका तसेच चित्रपटातून अभिनय साकारला आहे.