६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने केवळ भरतातूनच नव्हे तर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात होती. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षांच्या असल्यापासूनच त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःला झोकून दिले होते. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय तसेच कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शिवजीपार्क मैदानावर हजेरी लावली होती. अशातच मराठी कलाकारांनी देखील लता दिदींच्या अंतिम दर्शनाला हजेरी लावली होती मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना गेटवरच अडवण्यात आलं.

ही बाब स्वतः अभिनेत्री हेमांगी कवीने एका ट्रोलर्सला दिलेल्या उत्तरात म्हटले होते. मीडिया माध्यमातून लता दिदींच्या अंतिम दर्शनाला राजकीय बड्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली तिथेच बॉलिवूड सृष्टीतील कलाकार देखील उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले मात्र मराठी कलाकार यावेळी कुठे होते असा प्रश्न ट्रोलर्सनी सोशल मीडियावर उपस्थित केला होता. त्यावेळी हेमांगी कवीने मी तिथे अभिजित केळकर सोबत गेले होते पण आम्हाला गेटवरच अडवण्यात आलं होतं. कशी बशी विनंती करून हेमांगीने गेटमधून आत जाण्याची परवानगी मिळवली आणि लता दिदींचे अंतिम दर्शन घेतले. त्यावेळी हेमांगी कवी ने लता दिदींच्या पायावरची एक खास गोष्ट उचलून आपल्या सोबत आणली. ती खास गोष्ट म्हणजे लता दिदींच्या पायावर वाहिलेली सोनचाफ्याची फुले. ही सोनचाफ्याची फुले केवळ फुले नसून हा त्यांचा आशीर्वाद आहे असे म्हणून तिने ही फुले उचलून घेतली आणि स्वतःच्या जवळ जपून ठेवली आहेत. हा आशीर्वाद मी कायम जपणार आहे असे हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

माझ्याकडे असलेली ही सर्वात महाग वस्तू असेन असेही तिने नमूद केले आहे. सोनचाफ्याच्या सुकलेल्या फुलांचा एक फोटो हेमांगीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही फुले लता दीदींनी दिलेला आशीर्वाद म्हणून मी कायम जपणार आहे असे ती म्हणते. आज ६ मार्च रोजी लता दिदींना जाऊन एक महिना पूर्ण होत आहे. या क्षणाची आठवण म्हणून तिने ही बाब सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगी कवी म्हणते की, ‘आज एक महिना झाला! भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पायावरील वाहिलेल्या या सोनचाफ्याला! त्यांचा आशीर्वाद म्हणून उचलून घेतलं आणि जपून ठेवलं! कायम जपणार! माझ्याकडे असलेली सर्वात महाग वस्तू!’…. ती खास गोष्ट म्हणजे लता दिदींच्या पायावर वाहिलेली सोनचाफ्याची फुले.. सोनचाफ्याची फुले ..