मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारून हेमांगी कवी ने चंदेरी दुनियेत स्वतःची ओळख बनवली आहे. अभिनया व्यतिरिक्त हेमांगी तिच्या बेधडक वक्त्याव्यांमुळे आणि पोस्टमुळे नेहमीच चर्चेत आली आहे. मग कामाच्या ठिकाणी टॉयलेट्सची असुविधा असो किंवा बाई बुब्स आणि ब्रा बद्दलचे तिचे मत ती नेहमी सोशल मीडियावर व्यक्त करत असते. तिच्या कालच्या पोस्टमुळे हेमांगी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे./नुकतेच हेमांगीने कामानिमित्त परदेश दौरा केला आहे. न्यूयॉर्क येथे जाऊन ती कामासोबतच आपली ट्रिप देखील एन्जॉय करत आहे. या ट्रिपमध्ये तिने आपल्या मोबाईमध्ये काही फोटो कॅपचर केले आहेत.

मात्र परदेशात काढलेले हे फोटो खूपच क्लिन आणि क्लिअर येतात असा तर्क तिने यातून काढला आहे. हेमांगीच्या पोस्टमध्ये ती म्हणते की , ‘बाहेरच्या देशांमध्ये काढलेले photos जास्त clear and clean येतात. आपल्या आणि आपल्या mobile camera मध्ये Pollution चा थर नसावा म्हणून असेल का? ‘ असे म्हणत हेमांगीने आपल्या म्हणण्याचे स्पष्टीकरण देत तळ टीप देत सूचक विधान केले आहे की, त.टी : सहज एक observation आहे, कुठला महान शोध लावल्याच दावा अध्यक्ष करत नाहीयेत याची मंडळाने नोंद घ्यावी. आपल्या देशातल्या pollution ला मी ही कारणीभूत आहे याची मला जाणिव आहे.’ हेमांगीच्या म्हणण्याचे तात्पर्य एवढेच आहे की भारतात प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा परिणाम कॅमेऱ्यावर होत असावा. आणि म्हणूनच कॅमेऱ्यावर प्रदूषणाचा थर असल्याने इथे काढलेले फोटो स्पष्ट दिसत नाहीत. परदेशात त्यामानाने प्रदूषण खूप कमी असते. त्याचा फरक तिने काढलेल्या फोटोतून दिसतो असे तीचे म्हणणे आहे. भारतातील प्रदूषणाला मी देखील तेवढीच जबाबदार आहे त्यामुळे मी प्रदूषणाच्या किंवा भारताच्या विरोधात कुठलीही भूमिका घेतलेली नाही. असे हेमांगीने स्पष्ट म्हटले आहे.

मात्र हेमांगीच्या या बोलण्यावरून अनेकांनी तिला धारेवर धरले आहे तर काहींना तिचे म्हणणे पटले देखील आहे. तिच्या काही चाहत्यांचे देखील हेच म्हणणे आहे की परदेशात काढलेले फोटो खूप स्पष्ट दिसतात. भारतातील प्रदूषणाच्या प्रभावामुळे कॅमेऱ्यावर निश्चितच फरक पडतो. व्यक्त केलेल्या मतांवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया मिळत असतात. हेमांगीच्या या बोलण्यावरून तिला काही जणांनी बॉयकॉट केले जाईल, नाहीतर तू बाहेरच्या देशातच राहायला जा असेही म्हटले जात आहे. या पोस्टमुळे आपल्यावर टीका होणार हे हेमांगी अगोदरच जाणून आहे त्यामुळे मी देशाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही असेही तिने स्पष्ट म्हटले आहे. हा केवळ प्रदूषणाचा फरक असू शकतो असा तर्क तिने यातून लावला आहे. हेमांगीच्या अनेक चाहत्यांना तिचे म्हणणे पटले असून त्यांनी तिच्या बाजूने मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हेमांगीची ही पोस्टसुद्धा चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे.