मृण्मयी देशपांडे पाठोपाठ तिची धाकटी बहीण गौतमी देशपांडे हिने देखील मराठी सृष्टीतून स्वतःची ओळख बनवली आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमातून गौतमिने अभिनय साकारला आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच गौतमीला अभिनयाची ओढ लागली होती. नाटकातून काम करत असताना तिला सारे तुझ्याच साठी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हर्षद अतकारी सोबत गौतमीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. माझा होशील ना ही गौतमीची अभिनित केलेली आणखी एक मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. गौतमी उत्तम गायिका देखील आहे हे वेगवेगळ्या मंचावरून तिने दाखवून दिले आहे.

गौतमीचं गाणं आणि त्यावर मृण्मयीचं नृत्य ही त्यांच्या चाहत्यांसाठी जणू काही मोठी पर्वणीच असते. या दोघींमध्ये कधीकधी नोकझोक झालेली पाहायला मिळते. अनेकदा आपली बहीण आपल्या तालावर नाचायला लावते असा या दोघींचा समज असतो. काही वेळापूर्वी गौतमीने मृण्मयीला मिळत असलेल्या मानधनाबद्दल एक इंस्टा स्टोरी ऍड केली होती. त्यात तिने मृण्मयीच्या एका दिवसाची कमाई ही माझ्या महिन्याभराच्या पगाराईतकी असते असे म्हटले आहे. त्यामुळे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर प्रमाणे गौतमी आणि मृण्मयीच्या गोड भांडणाचा आस्वाद घेत असतात. गौतमीचे आजोबा देखील अभिनेते आहेत. आपल्या आजोबांसोबत काम करता यावे अशी तिची मनापासून ईच्छा होती. माझा होशील ना या मालिकेने तिची ही ईच्छा पूर्ण केली. दोन मालिका आणि चित्रपटातून झळकलेल्या गौतमीचा सोशल मीडियावर चांगला फॅनफॉलोअर्स आहे. तिचे गाण्याचे व्हिडीओ पाहण्यास तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. या प्रवासात तिला तिच्या चाहत्यांकडून वेगवेगळे प्रश्न वोचारले जातात. आस्क मी एनीथिंग या सेगमेंट मध्ये गौतमीला ‘तू लग्न कधी करणार आहेस?’ असा प्रश्न विचारण्यात आला.

गौतमीचा कुल अंदाज यावेळी अनुभवण्यात आला. चाहत्याने विचारलेला प्रश्न तिने तिच्या आईला विचारला. तेव्हा गौतमीच्या आईने ‘नको करुस एवढ्यात लग्न’ असे उत्तर दिले. आईचे उत्तर हेच माझे उत्तर असे म्हणत गौतमीने सध्या तरी लग्नाचा विचार बाजूला ठेवला असल्याचे दिसून येते. तिच्या या निर्णयाला आईचा देखील पाठिंबा असल्याने तिने आईचे कौतुक केले आहे. ‘कुल मदर’ अशी आईला उपमा देत लग्नाचा विचार अजून तरी केला नसल्याचे तिने म्हटले आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी या दोघांनी माझा होशील ना मालिकेतून एकत्रित काम केले होते. ही जोडी पारिजात या व्हिडीओ सॉंगमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे सध्या तरी गौतमी आपल्या करिअरकडेच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. असो अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…