अभिनेत्री दीपाली भोसले यांनी मराठी चित्रपट सृष्टीतला एक काळ गाजवला आहे. होऊन जाऊ दे, मुंबईचा डबेवाला, चष्मेबहाद्दर असे अनेक चित्रपट तिने प्रमुख नायिका म्हणून साकारले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून दीपाली राजकारणात सक्रिय आहेत. नगर जिल्ह्यात त्यांनी निवडणूक देखील लढवली होती. त्याच पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक कार्यांना त्यांनी हात घातला आहे. महा’ मारीच्या काळात अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे या कठीण काळात खारीचा वाटा उचलण्याचा त्यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत अधिक माहिती पुढिलप्रमाणे… को’रो”णा च्या पार्श्वभूमी वर सर्व सामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर दिपाली भोसले -सय्यद को’रो’ना हेल्पलाईन मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत यात पेशंटला तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले आहे… शिवाय ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येईल …रेमडीसीवर इंजेक्शन ची गरज भासल्यास जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील…एखादे खाजगी हॉस्पिटल बिल जास्त घेत असल्यास किंवा स्वच्छता नसल्यास तसेच पेशंट वर उपचार करतांना हलगर्जीपणा करत आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन त्या हॉस्पिटलवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. सामान्य नागरिकांच्या अशा अनेक अडचणी सोडवण्यासाठी सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबलच्या माध्यमातून त्यांनी हेल्पलाईनची स्थापना केली असून आहे.

संपुर्ण महाराष्ट्र भर को’ रोना पेशंटची काळजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे यासाठी प्रत्येक जिल्हात 100 प्रतिनिधी बारकाईने लक्ष देतील असे सांगण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास दिपाली भोसले सय्यद को”रोना हेल्पलाईन चे 2800 प्रतिनिधी काम पाहतील अशी घोषणा अभिनेत्री दिपालीने सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे. काही वर्षांपूर्वी दीपाली भोसले सय्यद यांनी नगर जिल्ह्यात मोठे हॉस्पिटल बांधणार असल्याचे सांगून एक कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारून घेतली होती. आताही अशा सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉलीवूड प्रमाणे मराठी सृष्टीतील बरेचसे कलाकार सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत त्यात अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल.