Breaking News
Home / जरा हटके / फक्त उपदेश आणि सल्ले देण्यापेक्षा ह्या अभिनेत्रीने जे केलं ते भल्या भल्यांना जमलं नाही

फक्त उपदेश आणि सल्ले देण्यापेक्षा ह्या अभिनेत्रीने जे केलं ते भल्या भल्यांना जमलं नाही

गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमार्फत महामारीला सामोरे जात असताना उपाययोजना आणि मदत जाहीर केलेल्या पाहायला मिळतात. अगदी मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनीही यात खारीचा वाटा म्हणून आपल्या कडून होईल ती मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला पाहायला मिळाला. यात आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने महाराष्ट्रभर विनामूल्य जेवणाची सोय करण्याचे जाहीर केले आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात… सामाजिक भान जपणारी ही मराठी अभिनेत्री आहे “अश्विनी प्रदीपकुमार महांगडे”.

Ashvini Pradipkumar Mahangade
Ashvini Pradipkumar Mahangade

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपतींची कन्या राणूआक्का बनून त्यांनी आपल्या अभिनयातुन प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर या मालिकेपूर्वी झी मराठीच्या अस्मिता या मालिकेतून अश्विनीने मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते आता स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अनघाची भूमिका त्या साकारत आहेत. अश्विनी महांगडे यांनी दोन वर्षांपूर्वी “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान “ची स्थापना केली आहे या प्रतिष्ठानमार्फत त्यांनी आजवर अनेक गरजूंना मदत केली आहे. याशिवाय सुरुवातीला ‘महावारी’ या वेबसिरीजमधून महिलांच्या समस्यांबाबत जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुरंदर येथील रयत बुक बँक असो वा रक्तदान शिबिर अशा सामाजिक कार्यात त्या नेहमीच हिरीरीने सहभागी होतात. नुकतेच रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत त्यांनी रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांसाठी विनामूल्य जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणताना दिसत आहेत.

actress Ashvini Mahangade
actress Ashvini Mahangade

विशेष म्हणजे फक्त एकाच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हा उपक्रम केला आहे. फलटण, सातारा, शिरवळ, खंडाळा, सासवड, बारामती, टिटवाळा शहर, ठाणे शहर, कल्याण शहर, अष्टा शहर, हिंडलगा बेळगाव, इस्लामपूर, नेरुळ, अंधेरी, घाटकोपर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी ही मोफत जेवणाची योजना आखल्याचे सांगितले आहे यासंदर्भात अधिक माहिती तुम्हाला त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन पाहता येईल. रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. “या महासंकटात बाहेर सर्वच गोष्टीची टंचाई निर्माण झाली आहे. या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे. आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती व शक्य त्या ठीकाणी आमचं कर्तव्य पार पाडीत आहोत. तुम्हीही यामधे सामील व्हा. ” असे म्हणून त्यांनी इतरांनाही मदतीचे आवाहन करण्यास सांगितले आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *