बाळू मामाच्या नावानं चांगभलं या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे याने काही दिवसांपूर्वी प्रिव्हेडिंगचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. येत्या काही दिवसातच तो आपली मैत्रीण मोनिका हिच्या सोबत लग्नगाठ बांधणार आहे. बाळू मामाच्या नावानं चांगभलं याच मालिकेतील एका अभिनेत्रीच देखील नुकच लग्न झालेलं आहे. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील अभिनेत्री अमृता उत्तरवार हिने २ डिसेंबर २०२२ रोजी विशाल बोनगीरवार याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. चंद्रपूर येथे ह्या दोघांनी आपलं लग्न केल्याचं दिसून येत. २ डिसेंबर २०२२ हि तारीख मराठी कलाकारांच्या आयुष्यातील खास तारीख असल्याचं दिसून येत कारण १,२ नव्हे तर तब्बल ३ मराठी कलाकारांच्या जोड्यांची ह्याच दिवशी लग्नगाठ बांधली आहे.

झी मराठी वाहिनीची लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि अंजली म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ह्यांनी २ दिवसांपूर्वी म्हणजे २ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात एका हॉटेलमध्ये लग्न केलं. यांच्या सोबतच झी वाहिनीची आणखीन एक मालिका माझा होशील ना या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आशय कुलकर्णी याने नृत्यांगना असलेल्या सानिया गोडबोले हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.सानिया गोडबोले हि अभिनेता सुव्रत जोशी याची मावस बहीण आहे. आता कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील अभिनेत्री अमृता उत्तरवार आणि विशाल बोनगीरवार यांचा विवाह झाल्याचं समजत. अभिनेत्री अमृता उत्तरवार हि पुसदची असून तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अमरावती युनिव्हर्सिटी मधू तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिने इंजिनीरिंग देखील केलं आहे आपल्या शिक्षणाच्या जोरावर तिने काम देखील मिळवलं. पण आपल्याला अभिनयातच करियर करायचं हे मनाशी ठाम बाळगलं आणि नाटकात कामे करायला सुरवात केली. घेतला वसा टाकू नको, नकळत सारे घडले, श्री गुरुदेव दत्त, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, गाथा नवनाथांची अश्या मालिकांत तिने छोटे मोठे रोल केले. बाळू मामाच्या नावानं चांगभलं ह्या मालिकेने तिला अमाप प्रसिद्धी मिळाली.

अभिनेत्री अमृता उत्तरवार आणि विशाल बोनगीरवार यांनी शाही थाटात चंद्रपूर येथे विवाह केला. या लग्नात बाळुमामाच्या मालिकेतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. ह्या वर्षी मे महिन्यात ह्या दोघांनी साखरपूडा उरकला होता. आणि आता २ नोव्हेंबर हि लग्नाची तारीख धरून त्यांनी लग्न सोहळा पार पडला. या लग्नाला अनेक मित्रमंडळी आणि सह कलाकार आवर्जून उपस्थित राहिली होते. शाही अंदाजात लव्ह असं लिहलेला केक देखील त्यांनी कापला. अभिनेत्री अमृता उत्तरवार आणि विशाल बोनगीरवार या दोघांनी देखील आपल्या शाही अंदाजात केलेल्या पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतो. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करताच अनेक कलाकार मंडळी आणि चाहता वर्गाने लग्नाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. अभिनेत्री अमृता उत्तरवार आणि विशाल बोनगीरवार याना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन..