देखणी नायिका म्हणून अमृता खानविलकर हिने मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. नुकताच येऊन गेलेला तिचा चंद्रमुखी हा चित्रपट मराठी रसिक प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसला. अमृताने हिंदी मालिका अभिनेता हिमांशू मल्होत्रा सोबत लग्नगाठ बांधली. मात्र अमृता आणि हिमांशू हे दोघेही कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. यावरून गेल्या वर्षी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी अमृता चांद्रमुखी चित्रपटासाठी मुंबईत वास्तव्यास होती. हे दोघेही एकमेकांना खूप कमी भेटत असले तरी त्यांच्यातील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही हे त्यांच्या प्रत्येक भेटीतून जाणवतं.

लग्नापूर्वी १६ वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखत होते. डबु रत्नानी यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा या दोघांची भेट घडून आली. आमच्या दोघांमध्ये आजही भांडणं होतात असे अमृता चाहत्यांशी संवाद साधताना म्हणाली होती. ‘ हिमांशू खूप शांत तर मी खूपच मस्तीखोर आहे. मी त्याच्यासोबत कधीच काम करू शकत नाही अगदी दोन मिनिटंही मी त्याच्यासारखी शांत बसू शकत नाही’. हिमांशू इन्स्टाग्रामवरून त्याच्या चाहत्यांशी नेहमीच संवाद साधत असतो. सोशल मीडियावर तो नेहमी एका चिमुरडीसोबत दिसतो. या चिमुरडीचे नाव आहे वैष्णवी प्रजापती. वैष्णवी बालकलाकार आहे हिंदी मालिकांमधून तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिमांशू वैष्णविला आपली लेक मानतो. १ जुलै २०२१ रोजी चिकू की मम्मी दूर की या मालिकेमुळे फिल्मसिटीमध्ये या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. इथेच हिमांशूला ही परी खूप आवडली आणि त्याने वैष्णविला आपली लेक म्हणूनच मानली. अमृता देखील अनेकदा वैष्णवी आणि हिमांशू सोबत एकत्रित वेळ घालवताना दिसते.

हे तिघेही नुकतेच एक ट्रिप एन्जॉय करताना दिसले. त्यावेळी अमृता आणि वैष्णवीने मिळून हिमांशूला खूप छळले असा मिश्किल आरोप हिमांशूने या मायलेकींवर लावला आहे. वैष्णवी प्रजापती ही डान्सर आहे. सुपर डान्सर चॅपटर २ या रिऍलिटी शोमध्ये तिने पार्टीसिपेट केले होते. सुरुवातीला शोमधून एलिमिनेट झाल्यानंतर पुन्हा तिला बोलावण्यात आले होते आणि टॉप ४ पर्यंत तिने मजल मारली होती. पवित्र भाग्य, चिकू की मम्मी बडी दूर की अशा मालिकांमधून ती बालकलाकार म्हणून झळकली आहे. वैष्णवी प्रजापती ही मूळची हरियाणाची परंतु आपल्या कुटुंबासोबत ती मुंबईत वास्तव्यास आहे. हिमांशू बऱ्याचदा दिल्लीहुन मुंबईला येतो त्यावेळी वैष्णवीची आवर्जून भेट घेतो. त्यामुळे खऱ्या आयुष्यात वैष्णवी प्रजापती ही हिमांशू आणि अमृताची मुलगी नसली तरी ते आपल्या मुलीप्रमाणेच तिच्यावर प्रेम करतात.