मराठी सेलिब्रिटी विश्वात एक प्रसिद्ध कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच या जोडीने केळवण आणि बॅचलर पार्टी देखील साजरी केलेली आहे त्यामुळे अवघ्या काही दिवसातच या दोघांच्या लग्नाचा बार उडालेला पाहायला मिळणार आहे. मराठी सृष्टीतील हे लाडकं कपल आहे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हार्दिक आणि अक्षया देवधर यांच्या घरी आता लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. हार्दीकने कुडाळ येथील आपल्या बहिणीच्या घरी जाऊन केळवण साजरे केलेले आहे. हे केळवण साजरे होताना अक्षया मात्र बॅचलर पार्टीसाठी पोंडेचेरीला रवाना झाली होती. त्यामुळे या केळवणाला हार्दिक सोबत ती उपस्थित राहू शकली नाही. काही दिवसांपूर्वी अक्षयाने आपल्या खास मैत्रिणींसोबत एक ट्रिप एन्जॉय केली.

दाक्षिणात्य पद्धतीने तिला बॅचलर पार्टी साजरी करायची होती. यानिमित्ताने तिने आणि तिच्या खास मैत्रिणींनी पोंडेचेरी गाठले. छानशी ट्रिप एन्जॉय करत तिने ही बॅचलर पार्टी साजरी केली आहे. यावेळी अक्षयाने ‘ब्राईड टू बी ‘ असे म्हणत लवकरच लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. अक्षया आणि हार्दिक मोठ्या धुमधडाक्यात लग्न करणार आहेत. लग्नासाठी लागणारे कपडे त्यांनी कोल्हापूर हुन मागवले होते. तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे कोल्हापूरशी त्यांचे भावनिक नाते जुळले आणि म्हणूनच आपल्या लग्नात कोल्हापुरी थाट असावा अशी त्यांची मनापासून ईच्छा होती. लग्नसोहळ्यासाठी त्यांनी पुण्यातील एक खास ठिकाण निवडले आहे. पुण्यातील कर्वे नगर परिसरातील पंडित फार्म्स या ठिकाणी विराजस आणि शिवानीने लग्नगाठ बांधली होती याच ठिकाणी आता अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लग्न करणार असे त्यांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसात या दोघांच्या घरी लग्नाची लगबग सुरू होणार आहे. अक्षया सध्या आपल्या मैत्रिणींसोबत ट्रिप एन्जॉय करत आहे त्यामुळे पुण्यात घरी परतल्यावर त्यांची लग्नाची लगबग सुरू होणार आहे. या दोघांच्या मेहेंदी, हळद आणि संगीत सोहळ्याचा थाट कसा सजणार आहे.

याची देखील उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. अक्षया आणि हार्दिक या दोघांनी आपल्या साखरपुड्याची बातमी मिडियापासून लपवून ठेवली होती. काही जवळच्या खास मित्रमंडळी, नातेवाईक आणि मालिकेतील सहकलाकार मंडळी यांना त्यांनी साखरपुड्याचे आमंत्रण दिले होते. मात्र साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यास त्यांनी मनाई केली होती. योग्य वेळ साधून या दोघांनीही सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी जाहीर केली होती त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्यात देखील असेच गुपित बाळगले जाण्याची दाट शक्यता आहे. अर्थात सेलिब्रिटिंचे लग्न म्हटले की त्याची उत्सुकता सर्वानाच असते आणि म्हणूनच अशा वेळी त्यांच्याकडूनच अशा प्रकारची गुप्तता बाळगण्यावर अधिक भर दिला जातो. असो अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी याना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…