Breaking News
Home / जरा हटके / या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची बहीण आहे अभिनेता मकरंद देशपांडे यांची पत्नी

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची बहीण आहे अभिनेता मकरंद देशपांडे यांची पत्नी

सरफरोश, स्वदेस, कायमत से कायमत तक, प्रहार, फरेब , मकडी, डरना जरुरी है, दगडी चाळ या आणि अशा कित्येक मराठी हिंदी चित्रपटात मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मकरंद देशपांडे पृथ्वी थिएटर्सशी जोडले गेले आहेत. त्यातून त्यांनी अनेक दर्जेदार नाटकांचे अभिनया सोबतच दिग्दर्शनही केले आहे. काही मराठी रिऍलिटी शोमधून ते परिक्षकाची भूमिका निभावताना दिसले आहेत. मकरंद देशपांडे हे अनेक वर्षांपासून निवेदिता पोहनकर हिच्यासोबत सात वर्षे लिव्ह इन रिलेशनववरून चर्चेत राहिले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. निवेदिता पोहनकर ही लेखिका म्हणून ओळखली जाते. पृथ्वी थिएटर्सची काही नाटकं तिने केली आहेत.

aditi pohankar and nivedita pohankar
aditi pohankar and nivedita pohankar

इथूनच मकरंद देशपांडे ह्याच्याशी तिची मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. निवेदिता पोहनकर ही मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहीण आहे. २०१४ साली रितेश देशमुखच्या लई भारी या गाजलेल्या चित्रपटात अदितीने नंदिनीचे पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे अदितीला चांगली लोकप्रियता मिळाली होती. अदितीने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमिपासून केली होती. सुरुवातीला ती देखील पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेली होती. लव्ह सेक्स और धोका या हिंदी चित्रपटातून अदिती पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली. हिंदी चित्रपटातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर अदितीने कुणासाठी कुणीतरी या चित्रपटातून मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. She आणि आश्रम या आणखी दोन हिंदी चित्रपटात अदितीला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अभिनयासोबतच अदितीने मॉडेल म्हणून २०१४ मध्ये काम केले आहे कॅडबरी फोरम, गोदरेज, एअरटेल यासारख्या जाहिरातीतून तिला झळकण्याची संधी मिळत गेली. निवेदिता आणि अदिती यांची आई शोभा पोहनकर या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी प्लेअर म्हणून ओळखल्या जातात तर त्यांचे वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पियन ठरले होते. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही अदितीने मराठी हिंदी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *