राहुल द्रविड भारतीय क्रिकेट विश्वातील एक नावाजलेलं नाव. राहुल क्रिकेट मधून निवृत्त झाला असला तरी भारतीय संघाचा कोच म्हणून काम पाहतोय. आज ११ जानेवारी राहुल द्रविडच्या वाढदिवस या निमित्त एका मराठी अभिनेत्रीने राहुल द्रविड सोबतच आपला फोटो शेअर करतराहुल द्रविड आणि तिच्या नातं असल्याचं सांगितलं आहे. ती म्हणते ” आपण एकाच कुटुंबातील आहोत याचा मला अभिमान आहे. तसेच, मला आमचे आडनाव खूप आवडते, मी ते कधीही बदलत नाही. आयुष्यभर प्रेम आणि आदर!” या मराठी अभिनेत्रीच नाव आहे आदिती द्रविड. सुंदरा मनामध्ये भरली या सध्या नंदिनीची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे.

मालिकेत अभिमन्यूचे आई वडील दोघेही लतिका आणि अभिमन्यू पुन्हा एकत्र यावेत या तळमळीतून आपल्या भावना व्यक्त करतात. नंदिनीची भूमिका “अदिती द्रविड” ही अभिनेत्रीने साकारली आहे. झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अदितीने शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अदिती आणि रसिका सुनील या दोघींची चांगली मैत्री झाली. या दोघींनी मिळून “यु अँड मी” हे व्हिडीओ सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. अदिती अभिनयासोबतच गीतकार देखील आहे तिने लिहिलेलं गाणं तिच्या ‘झिलमिल’ या अल्बमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. स्टार प्रवाहवरील ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर -महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतून तिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची थोरली बहीण तुळसाची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. अदिती आता कलर्स मराठी वाहिणीवरच्या सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेत आहे. नंदिनीच्या भूमिकेसाठी अदिती द्रविडला मनापासून शुभेच्छा…
