pbcl म्हणजे “पुनीत बालन सेलिब्रिटी लीग” चे आयोजन ६ जानेवारी ते ९ जानेवारी २०२२ या दिवसात करण्यात आले होते. एकूण ६ टीम मध्ये जवळपास ९० कलाकार एकत्र येऊन हे सामने खेळले गेले. ह्यामधील सर्व टीमची नावे देखील गडकिल्यांवर आधारित ठेवण्यात आली आहेत हे विशेष सिंहगड स्ट्रायकर्स, रायगड रॉयल्स, प्रतापगड वोरीयर्स, शिवनेरी लायन्स, पन्हाळा पँथर्स, तोरणा टायगर्स अशी ह्या टीम्सची नावे असून महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, सिद्धार्थ जाधव, शरद केळकर, प्रवीण तरडे आणि सुबोध भावे हे कलाकार कॅप्टन म्हणून नियुक्त झाले होते.

हे सर्व सामने पुण्यात लिजंड्स क्रिकेट गाऊंड मुंढवा आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम सारसबाग रोड येथे खेळले गेले. महेश मांजरेकरांची पन्हाळा पँथर्स आणि सुबोध भावे यांच्या शिवनेरी लायन्स या दोन संघात अंतिम सामना झाला. काळ ९ जानेवारी रोजी रात्री ७ ला हा सामना सुरु झाला. खरतर सुबोध भावे यांच्या शिवनेरी लायन्स हा संघ अंतिम फेरीपर्यंत असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण चांगला खेळ करत त्यांनी इथवर मजल मारली. १० ओव्हरच्या ह्या खेळात महेश मांजरेकरांची पन्हाळा पँथर्स यांनी प्रथम फलंदाजी करत ८ गाडी बाद ७६ धावांपर्यंत मजल मारली. जय दुधाने आणि आदिश वैद्य याना अंतिम सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. पण ह्या आधी त्यांनी खूप चांगला खेळ केला होता ह्या दोघांमुळे ते अंतिम सामना देखील जिंकतील अशी सर्वाना आशा होती. पण हे दोघेही अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरले. संजय जाधव यांनी मात्र चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. पन्हाळा पँथर्सने शिवनेरी लायन्स पुढे जिंकण्यासाठी ७७ धावांच आवाहन ठेवलं.

सुरवातीलाच सुबोध भावे यांच्या शिवनेरी लायन्स यांनी उत्तम खेळ केला संदीप जुवातकर याने ८ चेंडूत १७ धाव केल्या पण जय दुधाने याने उत्तम गोलंदाजी करत त्याची विकेट काढली. नंतर मात्र हळू हळू रण करत शेवटच्या ओव्हरला १५ रण करण्याचं आवाहन त्यांच्यापुढे होत. सोहम बांदेकर याने शेवटच्या २ बॉल शिल्लक असताना उत्तम षटकार मारला आणि शेवटच्या बॉलला २ रण काढत हा सामना जिंकलं. पुनीत बालन सेलिब्रिटी लीग १ चे जिंकण्याचे भाग्य सुबोध भावे यांच्या शिवनेरी लायन्स याना लाभले. अटीतटीच्या ह्या सामन्यात शेवटच्या बॉल पर्यंत चाललेल्या ह्या सामन्यात सुबोधभावे यांच्या टीमला यश मिळाल. सुबोध भावे यांनी संपूर्ण टीमला ह्याच श्रेय देत सर्व नियमांचे पालन करत उत्तम खेळ केला आणि सामना जिंकला असल्याचं म्हटलं.