Breaking News
Home / जरा हटके / अभिनेता उमेश कामतला मिळाला हा खजिना फोटो शेअर करत काय म्हणतो पहा

अभिनेता उमेश कामतला मिळाला हा खजिना फोटो शेअर करत काय म्हणतो पहा

मराठीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला उमेश कामत नाटक, मालिका आणि वेबसिरीज या तीनही माध्यमात मुशाफिरी करत असतो. सोशल मीडियावर तर उमेश नेहमीच सक्रिय असतो. नुकतेच त्याने इन्स्टाग्राम पेजवर काही खास फोटो शेअर केले आहेत. घराची सफाई करताना मिळालेल्या खजिन्यासोबत त्याचा फोटो व्हायरल होतोय. उमेशला मिळालेला हा खजिना नेमका काय आहे ते पाहिल्यावर उमेशप्रमाणे तुम्हालाही आनंदच होईल. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातील पहिल्या कामाचं कौतुक असतं. कलाकारांनाही या सगळ्या गोष्टीचं अप्रूप असतं. पहिला सिनेमा, पहिलं नाटक, त्यातील पहिली भूमिका हे सगळं आठवणींच्या रूपात जपण्यातील आनंद काही वेगळाच असतो.

actor umesh kamat
actor umesh kamat

त्यात मुलांच्या अशा खास गोष्टी आईबाबा अगदी निगुतीनं जपत असतात. मग त्या गोष्टी फक्त वस्तू बनून राहत नाहीत तर तो आयुष्यातील अनमोल खजिना होतो. असाच खजिना अभिनेता उमेश कामतच्या हाती लागला आहे. त्याच खजिन्यासोबतचे फोटो आणि आठवणी उमेशने त्याच्या इन्स्टापेजवर शेअर केल्या आहेत. उमेश सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असतो. त्यामुळे त्याच्या पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. नुकताच उमेशने त्याला खजिना मिळाला अशी कॅप्शन लिहून दोन फोटो पोस्ट केले आहेत. आता उमेशनच्या हाताला नेमका काय खजिना लागला हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नसेल तरच नवल. उमेशने काही व्हिसीआर, कॅसेट यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत उमेशनं असं लिहिलं आहे की, घराची साफसफाई करताना मला काही गोष्टी सापडल्या. माझ्या घरी आलेला पहिला व्हिसीआर माझ्या हाती लागला. आज माझ्या हातात आधुनिक गॅझेटस आहेत पण या व्हिसीआरची किंमत त्याला नाही. माझ्या आयुष्यातील पहिल्या मालिका, त्यातील सीन, माझे कार्यक्रम आईबाबांनी रेकॉर्ड करून या सीडीमध्ये ठेवले आहेत. त्यांना माझ्या अभिनयाचं खूप कौतुक होतं. मी सुरूवातीच्या दिवसात केलेल्या अभिनयाचं संचित हा माझ्यासाठी खजिनाच आहे. या आठवणी माझ्या स्मरणात कायम राहतील. ते दिवस पुन्हा कधीही येणार नाहीत. उमेशच्या या कॅप्शनवर चाहत्यांनी खूप हार्ट इमोजी पाठवले आहेत.

umesh kamat
umesh kamat

अभिनयाच्या प्रवासात इथंपर्यंत आल्यानंतर जेव्हा उमेशला घर स्वछता करत असताना आईबाबांनी रेकॉर्ड केलेल्या त्याच्या पहिल्या मालिका आणि नाटकाच्या व्हिसीआर बघून उमेश त्याच्या जुन्या काळात हरवून गेला. कितीही पैसे मिळाले तरी त्याला सापडलेला हा खजिना नेहमीच अमूल्य राहिल असं म्हणत चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलंय. उमेशचा मोठा भाऊ जयेश हा चंद्रलेखाच्या नाटकात काम करायचा. त्याचं नाटक बघायला उमेश आईबाबांसोबत जायचा. तेव्हा उमेशलाही नाटकात काम करण्याची संधी मिळाली. रणांगण हे उमेशचं पहिलं नाटक. त्यानंतर उमेशने खूप नाटकं केली. आभाळमाया, किमया, असंभव या मालिकांमध्येही उमेशने अभिनय केला. समर एक संघर्ष या सिनेमात उमेशने दिव्यांग मुलाची भूमिका केली. काही दिवसांपूर्वी अजूनही बरसात आहे या मालिकेत मुक्ता बर्वेसोबत उमेश दिसला. आणि काय हवं या वेबसिरीजलाही खूप प्रतिसात मिळाला. नवा गडी नवं राज्य हे नाटक आणि त्यावर बेतलेला टाइमप्लीज हा सिनेमाही गाजला. सध्या उमेश दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक करत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *