अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा प्रकरणामध्ये कोणताही संबंध नसताना फक्त नावात असलेल्या साम्यामुळे अभिनेता उमेश कामत ह्याला विनाकारण मनस्ताप झाला होता. राज कुंद्रा ह्यांचा पीए उमेश कामत म्हणजे हाच अभिनेता आहे असं काही टीव्ही न्युज मीडियाने दाखवल्यामुळे स्वतः अभिनेता उमेश कामत ह्याला समोर येऊन तो मी नव्हेच असं सांगावं लागलं होत. झालेल्या बदनामी बाबत तो कायदेशीर कारवाई देखील करणार असल्याचं त्याने नमूद केलं होत. पण मराठी अभिनेत्यांबाबद्द असं घडण्याची हि काही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वी अश्याच एका मराठी अभिनेत्याला संबंध नसतानाही मनस्ताप सहन करावा लागला होता.

२५ मे २०२१ रोजी मराठी अभिनेता संतोष जुवेकर ह्याच्या नावाशी एका मिळत्या जुळत्या वेगळ्याच संतोष जुवेकरने काही वादग्रस्त विधान केले होते. त्यात तो व्यक्ती म्हणाला होता कि, “आता अलिबागचे नाव बदलायची वेळ आली आहे, जसे जिल्हा कुलाबा होता तो आता रायगड केला तसेच तालुका अलिबागचा ता. श्रीबाग ता. सद्गुरू बाग किंवा समर्थबाग करावा. ” ह्या त्यांच्या वक्तव्यावर प्रशांत नाईकांनी आता हा शहाणा आला म्हणून कमेंट करत म्हटले होते ” तुमच्यातला कोणीतरी फालतू कलाकार बोलला म्हणून आम्ही आमच्या गावच नाव नाही बदलणार. आम्हाला अलिबागचा अभिमान आहे. त्यांच्या ह्या विधानावर स्वतः अभिनेता संतोष जुवेकरला उलगडा करावा लागला होता. ह्याचा आणि अभिनेता संतोष जुवेकरचा काही एक संबंध नसल्याने संतोषने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत म्हणाला ” मा. श्री प्रशांतजी नाईक आपला काहीतरी गैरसमज झाला आहे. हे संतोष जुवेकर जे FBaccount आहे ते माझे official account नसून ही comment मी केलेली नाही. आणि अलिबाग आणि अलिबागकार ह्यांच्या बद्दल जेवढं प्रेम आणि आदर तुम्हाला आहे तेवढाच मलाही आहे. कुणाचा बाप आला तरी अलिबाग हे अलिबागच राहणार.”
